मुख्याधिकारी साहेब ,पहिल्यांदा या नागरी समस्यांची सोडवणूक करावी लागेल. ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल तालुका शाखा मूलच्या वतीने सुसंवाद.
मुख्याधिकारी साहेब मूल शहर समस्यांच्या विळख्यात सापडले आहे हो, त्यातून आपण बाहेर पडायला हवं असेल तर.....
पहिल्यांदा या नागरी समस्यांची सोडवणूक करावी लागेल.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल तालुका शाखा मूलच्या वतीने सुसंवाद.
दीपक देशपांडे
ग्राहक पंचायत महाराष्ट्र मुल तालुका शाखा मूल च्या वतीने मूल शहरातील विविध समस्यांना घेवून मूल नगरपरिषद कार्यालयात मुख्याधिकारी यशवंत पवार यांचा स्वच्छ नगर स्पर्धेत विभागातून तिसरा क्रमांक आल्याबद्दल स्वागत करीत अभिनंदन केले .
याप्रसंगी नगरातील अनेक समस्यांना वाचा फोडत निवेदन देवून समस्यांविषयी साधकबाधक यशस्वी चर्चा करण्यात आली. या निमित्याने मूल शहरातील अर्धवट राहिलेले रस्ते व नाल्यांचे बाधकाम तातडीने पूर्ण करणे , मूल शहरांचे सौदर्य वाढविण्यासाठी लाखो रुपये खर्च करून तयार केलेले कांरजे ,जे सध्या बंद स्थितीत आहेत ते तातडीने दुरूस्त करणे,
मुल शहरातील सांडपाण्याचा निचरा होणाऱ्या नाल्या तूंबून गेल्यामूळे सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने डासांच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी . ,व पावसाळ्यात तुंबणाऱ्या नाल्यांमुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागू नये यासाठी तातडीने नाल्यांची सफाई करणे.
मूल शहरातील नागरीकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा एक समान दाबाने होणे बाबत तसेच शहरातील मुख्य मार्गावरील सुलभ शौचालय व मुत्रीघराचे बांधकाम तातडीने पूर्ण करणे ,व गांधी चौकात सुलभ शौचालय निर्माण करणे या बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. नगरातील मोकाट डुकरांच्या बंदोबस्तासाठी नव्याने प्रयत्न सुरू असून नवीन कंत्राटदार नियुक्त केला जाणार असून या प्रसंगी शासनाकडून निधी उपलब्ध झाल्याबरोबर अर्धवट राहीलेली रस्ता व नाल्यांची कामे, मुत्रीघर, सौंदर्यसाधणे,यांची दुरूस्ती व बांधकामे निश्चीतच वेळेत पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर राहील. आणि आम्ही पाणीपूरवठा बाबत तातडीने कार्यवाही करू आणि मिटरची जोडणी करून पाणीपुरवठा सुयोग्य पध्दतीने होईल यासाठी नगरप्रशासन तातडीने कार्यवाही करेल. असे आश्वासन मुख्याधिकारी यशवंत पवार यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल तालुका शाखा मूल च्या शिष्टमंडळाला आज दिले.
मुख्याधिकारी यशवंत पवार यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या या शिष्टमंडळात दीपक देशपांडे अध्यक्ष ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल यांचे नेतृत्वाखाली, परशूराम शेंन्डे,तुळशिराम बांगरे,रमेश डांगरे ,प्रमोद मशाखेत्री,बादल करपे,राहूल आगडे, गणेश आक्केवार इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*
*✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments
Post a Comment