*कृषी महाविद्यालय मूल येथे पालवी २०२४ स्नेहसंमेलन*

 *कृषी महाविद्यालय मूल येथे पालवी २०२४ स्नेहसंमेलन*

दीपक देशपांडे.



पालवी २०२४, वार्षिक स्नेहसंमेलनाचा उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री डॉ. परशुरामजी खुणे, प्रसिद्ध थिएटर कलाकार तसेच अध्यक्षस्थानी डॉ शामसुंदर माने, निर्देश संचालक तथा अधिष्ठाता डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला हे होते. उद्घाटन सोहळ्याप्रसंगी पालवी २०२४ या  मासिकाचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ विष्णूकांत टेकाळे, सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय, मूल यांनी केले. त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आतापर्यंत मिळवलेल्या प्राविण्याबद्दल तसेच महाविद्यालयीन शिक्षकांचे संशोधनात तसेच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासातही महत्वाचे योगदान असल्याचे सांगितले. प्रमुख अतिथी पद्मश्री डॉ. परशुरामजी खुणे यांनी शिक्षणासोबतच इतर कला जोपासणे गरजेचे आहे यावर भर दिला, आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवा त्यांची पूजा करा अशी संतांची शिकवण अंगीकृत करा असा उपदेश केला. अंगी असू दे एक तरी कला नाही तर उगाच जन्मला असे बोलून त्यांना मिळालेला पुरस्कार हा झाडीपट्टीचा सुद्धा गौरव असल्याचे व्यक्त केले. मनात संकल्प असेल तर नक्कीच यश येत  तसेच भविष्यात शेतीला येणारे महत्व यावर भर दिला. अध्यक्षीय भाषणात डॉ शामसुंदर माने यांनी असे वार्षिक स्नेहसंमेलन प्रत्येक महाविद्यालयात अनिवार्य करणे आवश्यक आहे जेणेकरून विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळेल, शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमधे असलेल्या गुणांनाही तेवढेच महत्त्व असल्याचे सांगितले. पूर्व विदर्भात भरड धान्याचे उत्पादन होत असून त्यांचे आहारातील शोषणाचे महत्व पटवून दिले.  विद्यार्थ्यांच्या मंडला कलाकृतीचे कौतुक करत त्यामूळे कल्पनात्मक शक्ती वाढून आपल्या बुद्धीला चांगल्या विचारांची चालना देते असे सांगितले तसेच विद्यार्थ्यांना कधीही आशा हारु नका नेहमी तुमचे ध्येय ओळखून ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा असा संदेश दिला. 

या स्नेहसंमेलनादरम्यान  प्रश्नमंजुषा, वादविवाद स्पर्धा, भारुड, भजन, नृत्य स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, चित्रकला, रांगोळी, मंडला तसेच व्हाॅलीबाॅल, क्रिकेट, बॅडमिंटन, कबड्डी, फूटबाॅल व ॲथलेथलेटिक्स सारख्या खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. स्नेहसंमेलनाच्या समारोपिय कार्यक्रमाला  श्री. नंदकिशोर कुंभारे, नायब तहसिलदार, मूल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या व अध्यक्षांच्या हस्ते विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले तसेच त्यांच्या भाषणात त्यांनी ॲग्रीकाॅस विद्यार्थ्यांची असलेल्या चांगल्या संबंधाचे कौतुक केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या  तर  ङाॅ टेकाळे यांनी समारोपीय  भाषणात सांगितले की, विद्यार्थिनी अभ्यासासोबतच आपल्यामधिल सुप्त गुण ओळखून आपला विकास करावा.   समारोपीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ. गजभिये यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन   कु. मोहिनी पुनसे व  डॉ.शिल्पा देशमुख यांनी केले व आभार प्रदर्शन डॉ. प्रीती दातीर यांनी केले. वार्षिक स्नेहसंमेलन उत्कृष्टपणे सफल करण्याकरिता महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे तसेच विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.