*शोषणमुक्त समाजाच्या जडणघडणीत जनतेनी ग्राहक हक्क समजून घेणे गरजेचे* शुरवी महाविद्यालयात ग्राहक जागृती सप्ताहा निमित्य ग्राहक व महिला दिन साजरा
*शोषणमुक्त समाजाच्या जडणघडणीत जनतेनी ग्राहक हक्क समजून घेणे गरजेचे*
शूरवी महाविद्यालयात ग्राहक जागृती सप्ताहा निमित्य ग्राहक व महिला दिन साजरा
मूल, न्यूज ब्युरो.
शोषणमुक्त समाजाच्या जडणघडणीत जनतेनी ग्राहक हक्क समजून घेणे गरजेचे, असल्याचे मत ग्राहक जागृती अभियानातील तिसरे पुष्प गुंफताना प्रमुख अतिथींनी व्यक्त केले.
मूल येथील शूरवी महिला महाविद्यालय येथे ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल तालुका शाखा मूल चे वतीने महिला ग्राहक जागृती अभियानांतर्गत एका विद्यार्थी ग्राहक जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात मूल मधील प्रसिध्द व्यावसायीक जीवनभाऊ कोंतमवार यांचे अध्यतेखाली व प्राचार्या हर्षा खरासे यांचे प्रमूख उपस्थितीत प्रमुख अतिथी म्हणून ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल तालुका अध्यक्ष दीपक देशपांडे ,संघटक तुळशिराम बांगरे, प्रमोद मशाखेत्री,रमेश डांगरे,मुक्तेश्वर खोब्रागडे इत्यादी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
ग्राहक संरक्षण कायद्याने ग्राहकांना अनेक हक्क दिले आहे मात्र माहितीच्या अभावामुळे ग्राहकांची वेगवेगळया पध्दतीने फसवणूक हेात असते त्यामूळे ग्राहक पंचायत महाराष्ट्र ने सुरू केलेली ही जनजागृती मोहीम महिलांना आणि सर्व सामान्य ग्राहकांना फायदेशीर ठरणार आहे. ही संधी आपल्या महाविद्यालयात उपलब्ध करून कायदयाची व ग्राहक अधिकारांची जाणीव करून देण्याचा त्यांचा उपक्रम अभिनंदनीय असून विद्यार्थीनींनी आपल्या घरापर्यंत आणि समाजापर्यंत पोहचविल्यास होणारी फसवणूक सहज टाळता येणे सहज शक्य आहे. असे प्रतिपादन अध्यक्ष स्थानावरून बोलतांना जिवन कोंतमवार यांनी केले.
प्रमुख अतिथी दीपक देशपांडे यांनी ग्राहक हक्क व ग्राहक संरक्षण कायदा १९८६आणि२०१९बद्दल माहिती देताना ग्राहकांच्या होणा-या फसवणूकीपासून बचावासाठी पावती मागणे हा ग्राहकांचा मुलभुत अधिकार असून पावतीची मागणी केली गेल्यास होणा-या कुठल्याही प्रकारच्या फसवणूकी पासून आपण बचाव करू शकतो, न्याय मागू शकतो , किमान एका अन्यायाविरुद्ध आपले मत मांडू शकतो असे प्रतिपादन केले. त्यासाठी शासनाने तयार केलेल्या न्यायदानाच्या तिन्ही व्यवस्थांबाबत मार्गदर्शन करताना ग्राहक संस्था, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद , ग्राहक तक्रार निवारण आयोग याबाबत सविस्तर माहिती दिली. व ग्राहकांनी निमुटपणे अन्याय सहन करण्या ऐवजी तक्रार करायला सुरुवात करावी असे आवाहन केले,आणि सर्वत्र ग्राहक संघटित होण्याची आवश्यकता प्रतिपादीत केली.
रमेश डांगरे यांनी *ग्राहक* या शब्दाची व्याप्ती स्पष्ट करत ग्राहक म्हणून मिळालेल्या अधिकारांची व त्यानुषंगाने मिळवलेल्या न्यायाची उदाहरणासहीत माहीती दिली.
याप्रसंगी बोलतांना प्रमोद मशाखेत्री यांनी शासनाच्या वतीने देण्यात येणा-या प्रमाणपत्रासाठी लागणा-या आवश्यक कागदपत्रा बाबत माहिती दिली.
तसेच यावेळी बोलतांना मुक्तेश्वर खोब्रागडे यांनी कृषीविषयक बि -बियाणे खते खरेदी करताना घ्यावयाची काळजी व त्यासाठी पावती व पिशवीसह टॅगसह लागून असलेले प्रमाणपत्र व मुठभर धान्य किंवा खते जपून ठेवल्यास बि बियाणे उगवणीत अडथळा आल्यास वा बियाण्याची उगवण क्षमता कमी असल्यास वा बियाण्यात काही अभाव असल्यास त्याविरूध्द दाद मागण्यास सहाय्यकारी ठरेल हि बाब विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना समजावून सांगण्याची आवश्कता पटवून दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या सहयोगी प्राध्यापक डाॅ.मिनाक्षी राईचवार यांनी , ग्राहक गित गायन महाविद्यालयातील विद्यार्थीनिंनी केले. आभार प्रदर्शन प्रा.सौरभ तरारे यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होत्या , कार्यक्रमाची सांगता उपस्थितांच्या मनातील शंका समाधानाने करण्यात आली.
*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*
*✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments
Post a Comment