अतिवृष्टीमुळे नुकसान!शासनाची नुकसानभरपाई प्रक्रिया सुरू.

 अतिवृष्टीमुळे नुकसान!शासनाची नुकसानभरपाई प्रक्रिया सुरू.

दीपक देशपांडे 

मूल तालुक्यातील माहे जुलै 2023 रोजी आलेल्या अतिवृष्ठी व पावसामुळे शेतपिकाचे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतक-यांना शेतपिक नुकसानीचा लाभ मिळण्याकरीता ईकेवायसी   मूल येथील  प्रेरणा आपले सरकार सेवा केंन्द्र व सिएसी केंन्द्र मूल पंचायत समिती कार्यालयासमोरील सेतू केंन्द्रात  दिनांक  २९फेब्रुवारी रोजी  आधार प्रमाणीकरण नोंदीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. व १७ शेतक-यांनी त्याचा लाभ घेतला.

शासनाने तहसील कार्यालय मूल यांनी शेतक-यांना शेतपिक नुकसानीचा झालेल्या शेतक-यांना आधार प्रमाणीकरणाच्या सूचना दिल्या आहेत. माहे एप्रील २०२३ मध्ये आलेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे ११६ नुकसानग्रस्त खातेदाराचे ५९.५५ हे. आर शेतपिकाचे नुकसान झालेले होते. तसेच माहे जुर्ले, २०२३ रोजी आलेल्या अतिवृष्टी व पावसामुळे २६५ खातेदाराचे १२२.२४ हे. आर शेतपिकाचे नुकसान झालेले असुन शेतपिक नुकसान झालेल्या खातेदाराच्या यादया पोर्टलवरुन Online अपलोड करण्यात आलेल्या आहेत. 

अपलोड करण्यात आलेल्या खातेदाराच्या यादयामध्ये २१८ खातेदाराच्या नावासमोर विशिष्ट क्रमांक खातेदाराच्या नावासमोर देण्यात आलेला आहे.जोपर्यत खातेदार E-KYC प्रमाणीकरण करणार नाही तोपर्यंत खातेदाराला शेतपिक नुकसानीचा लाभ/मदत मिळणार नाही.
शेतपिक नुकसान विशिष्ट क्रमांक तालुक्यातील कोणतेही पात्र लाभार्थी e- पात्र लाभार्थी e-kyc प्रमाणीकरण अभावी शेतपिक नुकसान लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. अशा आशयाचे पत्र (मृदुला मोरे) तहसिलदार, मूल यांनी जारी केल्यानंतर ही कार्यवाही सुरू झालेली आहे.

त्या आदेशानुसार आधार प्रमाणीकरण करण्याच्या कामाचा प्रारंभ करण्यात आल्याने परिसरातील शेतक-यांनी समााधान व्यक्त केले.मूल तालुक्यातील २१८ सभासद असून त्यापैकी  प्रेरणा आपले सरकार सेवा केंन्द्र व सिएसी केंन्द्र मूल पंचायत समिती कार्यालयासमोरील सेतू केंन्द्रातयेथे १७ नागरीकांचे आधार प्रमाणीकरण करून देण्यात आले.
बेलघाटा ,बेंबाळचक,बेंबाळ,भेजगाव,बोंडाळा बुज,बोरचांदली,बोरघाट चक,माल चक घोसरी,चक नलेश्वर,चक वकडपेठ, चिखलीमाल,चिमढा, गोवर्धन, जुनासूर्ला, मक्ता,दाबगाव,,जुनासूर्ला,खांडाळ रीट, कोंसबी,मानकापूर,मारोडा, मुरमाडी, नलेश्सर,नांदगाव, राजगड,राजोली, सिंतळा, सोमनाथ,सुशी दाबगाव, ताडाळा तुकुम, टेकाडी,उश्राळा,येरगाव,विहीरगाव तुकूम, बोरचांदली,बालाघाट,चक नलेश्वर,दाबगाव मक्ता, डोंगरगाव,जुनासूर्ला,मंदा तुकूम , मोरवाही माल,उश्राळा, विरई, उथळपेठ, इत्गयादी गावातील शेतकरी लाभार्थ्यांना  या योजनेअंतर्गत  आधार प्रमाणीकरण  करायचे आहे.

लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन प्रेरणा आपले सरकार केंद्र संचालकांनी आमच्या सोबत बोलताना केले आहे.


*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.