भारत रत्न' चा जमालगोटा🤣. 🍳आरसा...@विनोद देशमुख
भारत रत्न' चा जमालगोटा🤣
🍳आरसा...@विनोद देशमुख
--------------------------------------
'
पाकिस्तानातून भारतात येऊन देशासाठी आयुष्य वेचणारे 'निर्वासित' लालकृष्ण अडवानी यांना 'भारत रत्न' देण्याचा निर्णय अंधविरोधकांच्या पचनी पडलेला नाही. काय तर म्हणे, रामजन्मभूमी प्रकरणात रथयात्रा काढून त्यांनी देशभर (हिंदू) धर्मांधता पसरविली आणि बाबरी मशीद पाडण्यास प्रोत्साहन दिलं. राममंदिर पाडून तेथे मशीद बांधण्याऱ्यांचा हे लोक निषेध करत नाही (संविधानानं घालून दिलेल्या कायद्याच्या चौकटीत हे सिद्ध झालं असताना सुद्धा😣) आणि चुकीच्या दुरुस्तीचा तुमचा अधिकारही मान्य करत नाहीत. तरीही हेच स्वत:ला संविधानाचे पुरस्कर्ते म्हणवतात. अशा डबल ढोलकी मंडळींना अडवानींच्या भारत रत्नाचा पोटशूळ उमळणारच.
अडवानींच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट हे सारे लोक (मुद्दाम) विसरत आहेत. फाळणीचे भुक्तभोगी असलेल्या सिंधी समाजाचे अडवानी हे प्रतिनिधी आहेत. इतर सिंधी बांधवांप्रमाणेच तेही देश खंडित होण्याच्या काळात सिंध प्रांतातून भारतात आले आणि स्वकर्तृत्वानं देशाचं तिसरं सर्वोच्च पद असलेले उपपंतप्रधान होऊनच थांबले. एक निर्वासित सिंधी एवढं यश मिळवतो, हे कर्तृत्व लहान किंवा कमी प्रेरणादायी आहे का ? शेवटी, पुरस्कार हे इतरांना प्रेरणा देण्यासाठीच दिले जात असतात. त्या अर्थानं अडवानींच्या विलक्षण कर्तृत्वाचा गौरव करण्यात गैर काय आहे ? मात्र, कावीळ झालेल्यांना पांढरंशुभ्र स्वच्छ असं काही कधीच दिसत नसतं. पण, तुमच्यातल्याच एका ज्येष्ठाचा संयम बघा. शरद पवार यांनी अडवानींच्या (आणि कर्पूरी ठाकुरांच्याही) भारत रत्नांचं 'योग्य' अशा शब्दात स्वागत केलं. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणि धर्म हे विषय जोडण्याची खोड जडलेल्या नकारात्मक लोकांनी आपल्या या 'आका'चा तरी आदर्श घ्यावा की नाही ?
पण नाही. हिंदूंच्या कोणत्याही गोष्टीला चांगलं म्हणायचंच नाही आणि विरुद्ध बाजूंना मात्र सतत डोक्यावर घ्यायचं, हेच धोरण हे लोक गेली पाऊणशे वर्षे राबवत आले आहेत. स्वातंत्र्याच्या तोंडावर बॅरिस्टर जिनानं बंगालमध्ये केलेली डायरेक्ट ॲक्शन असो, फाळणीनंतर पाकिस्तानातून येणारे लोंढे असो, काश्मिरी पंडितांना पळवून लावणं असो, रोहिंग्यांची घुसखोरी असो, देवदेवतांच्या शोभायात्रांवर वेळोवेळी होणारे हल्ले असो, गोध्रा येथे रेल्वे डब्यात रामसेवकांना जाळून मारणं असो (नंतर उमटलेल्या प्रतिक्रियांवर मात्र अजूनही तोंड फाटेपर्यंत टीका) की मुंबईच्या आझाद मैदानात सरकारला आव्हान देणारा धुमाकूळ असो, समस्त बेगडी पुरोगाम्यांच्या/मानवतावाद्यांच्या तोंडाला कायम हरिसनका ताला🤔 असे दुटप्पी, पक्षपाती, विरोधकांचा द्वेष करणारे लोक अडवानींच्या भारत रत्नाला चांगलं म्हणतील, ही अपेक्षाच चुकीची आहे. याच लोकांनी अडवानी विरुद्ध मोदी, असा संभ्रम देशभर पसरविला आहे. पंतप्रधान झाल्यापासून मोदींनी अडवानींकडे दुर्लक्ष केलं आहे, त्यांना राष्ट्रपती बनवलं नाही, राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला येऊ दिलं नाही वगैरे वावड्या हेच लोक उठवत आहेत. त्या सर्वांचे चेहरे कालपासून पाहण्यासारखे झाले आहेत. अरे, मोदींनी हे काय केलं ? उत्तर आहे- त्यांनी जमालगोटा दिला😀
भाजपात मोदी हे अडवानींचेच शिष्य आहेत. त्यांच्या ऐतिहासिक सोमनाथ ते अयोध्या रामरथाचं प्रथम सारथ्य मोदींनीच केलं. (नंतरच्या टप्प्यात प्रमोद महाजन सारथी होते.) अडवानी दुसऱ्यांदा भाजपाध्यक्ष असतानाच मोदींना पक्षाचं राष्ट्रीय सचिव नेमण्यात आलं. त्यांनीच गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून अडवानींना पहिल्यांदा आणि नंतर तीन वेळा निवडून आणलं. मोदींच्या पहिल्या सरकारनं त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरविलं आणि त्याचीच तार्किक परिणती कालच्या भारत रत्नात झाली. अंधविरोधकांनी रचलेल्या कहाण्यांना दिलेलं चोख उत्तर. जमालगोटा घेऊन बसवत असेल तर बसा कुरकुरत, बोटं मोडत, शिव्याशाप देत😜
स्वातंत्र्यापासून आतापर्यंत 50 मान्यवरांना भारत रत्न बहाल करण्यात आलं आहे. ख्रिश्चन मिशनरी असलेल्या मदर तेरेसा (1980), तसंच सरहद्द गांधी खान अब्दुल गफ्फार खान (1987, पाकिस्तान) आणि नेल्सन मंडेला (1990, दक्षिण आफ्रिका) या परदेशी नेत्यांना सुद्धा हा पुरस्कार देण्यात आला. जवाहरलाल नेहरू (1955) आणि इंदिरा गांधी (1971) यांना तर ते पंतप्रधानपदावर असतानाच गौरविण्यात आलं. ते सारं चांगलं. अडवानींच्या पन्नासाव्या भारत रत्नावर मात्र प्रश्नचिन्ह लावलं जात आहे. बडी नाइन्साफी है और बेइमानी भी😢
++++++++++
.jpg)


Comments
Post a Comment