चंद्रपूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद ;-बैठकीचे आयोजन केवळ एक औपचारिकता तर नाही?
चंद्रपूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद ;-बैठकीचे आयोजन केवळ एक औपचारिकता तर नाही?
दीपक देशपांडे.
३१जानेवारी २०२४रोजी चंद्रपूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची नवीन समिती गठित झाल्यानंतरची पहिलीवहिली सभा आयोजित करण्यात आली होती , शासन निर्णयानुसार या समितीच्या सभेचे अध्यक्षस्थान जिल्हाधिकारी भूषवत असतात ,अत्यंत महत्त्वाचे काही कारणास्तव ते या सभेला उपस्थित राहू शकत नसतील तर अतिरिक्त जिल्हाधिकारी अथवा निवासी उपजिल्हाधिकारी यांनी सभेचे अध्यक्षस्थान भुषविण्याची तरतुद असतांनाच या समितीची पहिली बैठक समितीच्या सचिवांनी , चंद्रपूर जिल्हा पुरवठा अधिकारी श्री.चरडे यांनी आपल्याच अध्यक्षतेखाली ही सभा संचालित केलीच कशी? असा प्रश्न जून्या जाणत्या सदस्यांनी उपस्थित केला आहे, परिणामी या समितीचे कार्य म्हणजे एक औपचारिकता तर नाही ना असे म्हणत समितीच्या कार्यप्रणाली वर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या समितीच्या सभेचे कार्यवृत्त जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने प्रसिद्धी माध्यमांना पोहोचणे गरजेचे असते मात्र सारेच कसे , आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातय या पद्धतीने कार्य सुरू आहे.
ग्राहक संरक्षण परिषद,जिल्हा चंद्रपूर,ची पहिली मासिक सभा ,जिल्हा पुरवठा अधिकारी, चंद्रपूर यांचे कार्यालयात दिनांक ३१ जानेवारी २०२४ रोजी संपन्न झाली या सभेत जिल्हा पुरवठा अधिकारी श्री चरडे साहेब, अध्यक्ष स्थानी,होते, ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा शाखा चंद्रपूर चे श्री परशुराम तुंडुलवार, अध्यक्ष,श्री अरुण जमदाडे,जिल्हा उपाध्यक्ष श्री आनंद मेहरकुरे,जिल्हा सचिव, श्री देविदास नंदनवार,जिल्हा संघटक,श्री मनोहर शेंडे, कोषाध्यक्ष,असे ५ अशासकीय नवीन सदस्य म्हणून उपस्थित होते,तसेच इतर संघटनेचेही काही नवीन पदाधिकारी उपस्थित होते, सोबतच काही जून्या समितीत सदस्य असणारे सदस्यही उपस्थित होते तर सभेत काही मोजकेच शासकीय अधिकारी सुद्धा हजर होते. परंतू हे सारे बोटावर मोजता येणे सहज शक्य होते.
समितीचे गठन करताना या समितीत वेगवेगळ्या संस्था संघटना, विविध विभाग आणि शासनाच्या विविध विभागातील कोणत्या अधिकाऱ्यांनी या सभेला उपस्थित राहणे आवश्यक आहे याचे परिपत्रक असतांनाच केवळ आपले प्रतिनिधी पाठवून औपचारिकता पूर्ण करण्याचा शासकिय विभागाचा प्रयत्न सुरू आहे.
ग्राहक संरक्षण परिषदेची चंद्रपूरची ही पहिली बैठक. खरे तर जिल्हाधिकारी यांनी स्वतः उपस्थित राहायला पाहिजे होते. परंतु पुरवठा अधिकारी आणि इतर मोजक्या शासकीय अधिकारी यांच्यासोबत ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे पदाधिकारी सर्वश्री तुंडूलवार, जमदाडे ,मेहरकुरे, नंदनवार, मनोहर शेंडे हे पाच सदस्य व इतर संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते व त्यांनी या सभेत केवळ संवाद साधला. सगळ्यांनाच पुढील वाटचाली करिता हार्दिक शुभेच्छा ,कारण काहीच नसण्यापेक्षा काहीतरी आहे ह्याचे आपले वेगळेच समाधान असते ना?
मात्र या बैठकीत खरेतर सगळ्यांचा परिचय पिठासीन अध्यक्षांनी करून घ्यायला हवा होता तसे तर झाले नाहीच मात्र परिचय करुन देण्याबाबतीत मागणी केली गेली होती पण परिचय करून दिला नाही .परंतू चर्चेत सहभागी होत असताना उपस्थितांच्या असे लक्षात आले की या सभेत केवळ चंद्रपूर चे तहसीलदार,विज मंडळ चंद्रपूर चे कार्यकारी अभियंता,एस पी आफिस चे निरीक्षक, वजनमाप विभागातील अधिकारी, अन्न भेसळ विभागाचे अधिकारी तेवढे उपस्थित होते.
एकंदरीत काय तर या बैठकीच्या आयोजनाची केवळ आणि केवळ औपचारिकताच या निमित्ताने पार पाडली गेली , आणि नवनियुक्त सदस्यांना सभेच्या आयोजनाचे गाजरच दाखविण्यात आले.
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या स्थापनेचा मुळ उद्देश काय? यानिमित्ताने असा प्रश्न उपस्थित होऊच शकतो ना?
या महिन्यात निवडणुकांचा बिगूल वाजल्यास पुन्हा तिनचार महिने या समितीच्या पुढील बैठकी होतील आणि समिती सदस्यांनी सर्वसामान्य जनतेच्या वा त्यांच्या समस्या या समितीपुढे ठेऊन न्याय मिळवून घेणे केवळ अशक्य असल्याचे दिसून येत आहे परिणामी या समितीच्या एकूणच कार्यप्रणालीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याखेरीज राहणार नाही आणि ही समिती म्हणजे केवळ औपचारिकता ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*
*✍️Ddbatmiportalm2m✍️*
.jpg)

Comments
Post a Comment