लपवू नका डोहाळे😜,🍳आरसा...@विनोद देशमुख
लपवू नका डोहाळे😜
🍳आरसा...@विनोद देशमुख
--------------------------------------
काल उद्धव ठाकरे रायगड दौऱ्यावर होते. त्यानिमित्त पेण येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना त्यांनी आपलं पंतप्रधानपदाचं स्वप्न अप्रत्यक्षपणे उघडच केलं🤔 माजी केंद्रीय मंत्री आणि रायगडचे माजी खासदार अनंत गीते यांचं नाव घेऊन ते म्हणाले- "गीतेसाहेबांनी माझी थोडी पंचाईत केली. ते काय म्हणाले, उद्धव ठाकरेच परत मुख्यमंत्री होणार. अहो, मी पंतप्रधानपदाचं स्वप्न बघू की नको, असा प्रश्न पडलाय्😝 (टाळ्या. लगेच सावरत) नाही, मला असं काही स्वप्न पडत नाही. ना मुख्यमंत्रिपदाचं पडलं होतं. पंतप्रधानपदाचं स्वप्न तर स्वप्नातही स्वप्न पडत नाही मला. मला फक्त दिसतोय् तो माझा देश, माझी भारतमाता."
वरील भाषण वाचून (किंवा ऐकून) तुमचा काय समज झाला ? उद्धव ठाकरेंना पंतप्रधानपदाचं स्वप्न पडू लागलं आहे, असाच ना. त्याशिवाय का हा मुद्दा त्यांच्या तोंडून निघाला ? काही प्रयोजनच नव्हतं. गीते मुख्यमंत्रिपदाबद्दल बोलले होते. ठाकरेंनी त्याला पंतप्रधानपद कसं काय जोडलं😣 म्हणजे मनात कुठंतरी आहे. घमंडिया आघाडीची सध्या झालेली खस्ता हालत आणि पंतप्रधानपदाचे संभाव्य प्रमुख दावेदार नेते आघाडीतून बाहेर पडणे, यातून एक अंधुकशी का होईना, आशा निर्माण झाली आहे आणि तीच पेणमध्ये ओठातून बाहेर पडली, एवढं जनतेलाही कळतं बरं का.
तीन प्रमुख घटकपक्षांनी या कडबोळं आघाडीचा घमंड तोडला आहे. "देशात इतरत्र आम्ही आघाडीत राहू, पण बंगालमध्ये लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवू," असं ममता बॅनर्जीनं एकतर्फी जाहीर केलं. दुसरे दावेदार बिहारचे नितीशकुमार तर पुन्हा भाजपाच्या दावणीला बांधून घेत नवव्यांदा मुख्यमंत्री झाले. (एक मार्मिक जोक : बिहार राज्यात सरकार बदलत नाही, विरोधी पक्ष बदलतो😥) पंजाबमध्ये आप स्वतंत्र लढेल, असं मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांनी जाहीरच केल्यानंही वांधा झाला आहे. या पृष्ठभूमीवर ठाकरेंना आणि त्यांचे सल्लागार विश्वप्रवक्ते यांना आशेचा किरण दिसू लागला असल्यास नवल ते काय😊
पण, एक झमेला आहे. घमंडिया आघाडीचं 'पंतप्रधानपद' रिकामं आहे का, हाच मूळ प्रश्न आहे. युवराज राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेवर याचवेळी उगाच निघाले का😩 कॉंग्रेसचा पंतप्रधानपदाचा चेहरा आहे तो. मग, आघाडीतील दुसऱ्यांनी स्वप्न पाहण्याला काही अर्थ उरतो का ? तरीही, ठाकरेंनी स्वप्न पाहायला हरकत नाही. कारण, स्वप्नं खरी होतातच, असं नसतं. पण, पाहत असाल तर कबूल करण्यात मर्दपणा असतो. उगाच, मला स्वप्न पडत नाहीय्, मला व्हायचं नाही वगैरे सारवासारव करण्याचं कारण नाही. निदान स्वत:च्या विश्वप्रवक्त्याकडे तरी बघा. ते कसे रेटून बोलतात, ठाम राहतात, जगाची पर्वा न करता🤣 एक प्रश्न : स्वप्नातही स्वप्न पडत नाही, म्हणजे काय हो😢
++++++++++
*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*
*✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments
Post a Comment