सुभाष उच्च प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलनात कबड्डी व समूह नृत्याची मेजवानी

 सुभाष उच्च प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलनात कबड्डी व समूह नृत्याची मेजवानी 

मूल :-न्यूज ब्युरो 


विद्यार्थ्याच्या क्रीडा व कला गुणांना वाव मिळावा यासाठी सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूलच्या वार्षिक स्नेहसंमलनाचे आयोजन करण्यात आले. या संमेलनाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते नरसिंग गणवेनवार यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मोतीलाल टहलियानी होते. प्रमुख पाहुणे  म्हणून पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल चुधरी, ज्येष्ठ पत्रकार प्रा. महेश पानसे, शाळा सल्लागार समितीचे अध्यक्ष प्रा. मारोतराव पुल्लावार, नगर परिषद मूल चे माजी सभापती प्रशांत समर्थ, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बोबाटे, रुपेश मारकवार, लोकनाथ नर्मलवार, साहील येंगंटीवार, डेव्हिड खोब्रागडे ,  माजी नगराध्यक्ष उषा शेंडे,  लिना बद्देलवार, लता गावतुरे, शाळेचे मुख्याध्यापक अविनाश जगताप , पदवीधर शिक्षक राजू गेडाम,पालक प्रतिनिधी रमेश बोरकर आदी उपस्थित होते. 

यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यासाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन करून त्याच्या सुप्त गुणांना वाव देण्याचा प्रयत्न करीत असल्याने खरोखरच अभिनंदनिय बाब असुन भविष्यात चांगले विद्यार्थी घडतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

 प्रास्ताविक करताना  मुख्याध्यापक अविनाश जगताप यांनी शाळेच्या उन्नतीसाठी पालकांचा सहभाग घेवुन विविध उपक्रम राबविले जातात. त्यामुळे पालकांचा ओढा मोठ्या प्रमाणात शाळेकडे असल्याचे मत व्यक्त करीत भविष्यात शाळा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करील असा विश्वास व्यक्त केला. 

या स्नेहसंमेलनात चार दिवस नृत्य, क्रीडा व आनंद मेळाव्याचे आयोजन केले आहे.कार्यक्रमाचे  संचालन बंडु अल्लीवार,  तर उपस्थितांचे आभार रिना मसराम यांनी मानले.

*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.