नजरेच्या टप्प्यात:-एक पोस्ट दोन विषय :अर्धवट-रंगलेली चर्चा.
नजरेच्या टप्प्यात:-
एक पोस्ट दोन विषय :-अर्धवट रंगलेली चर्चा , निष्पन्न काय?
दीपक देशपांडे
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरातील सोमनाथ रोड वरती नवीन बिना लायसन च्या भट्ट्या बिनधास्तपणे चालू आहेत याकडे पोलीस विभागाचं दुर्लक्ष दिसत आहे खुलेआम सर्रास देशी दारूची विक्री करण्यात येत आहे मोठ्या प्रमाणात जमाव सायंकाळी होत असतो तरी मी मूल पोलिसांना विनंती करतो की तात्काळ कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे. या आशयाची एक पोस्ट शहरातील एका व्हाट्सअप गृपवर शेअर झाली आणि चर्चा सुरू झाली.
काही वेळातच त्यावर उत्तर आले ,भाऊ तिथेच काय? मूल मध्ये पोलीस विभागाच्या आशीर्वादाने हप्ते घेऊन वॉर्डा -वॉर्डात दारूची दुकानें चालू आहेत.
परत एकदा मुळ तक्रार कर्त्याने उत्तर दिले, पोलीस विभागाने कारवाई करायला हवी एवढा बिनधास्तपणे सगळं चालू असतानाही कोणीही ऍक्शन घेत नाही आणि मूल शहरासाठी फक्त दोन ट्राफिक पोलीस आहेत आणि एवढा मोठा प्रमाणात ट्राफिक शहरातून जात असते:
त्यावर एका राजकीय व्यक्तीचा सुचक संदेश आला ,ट्रॅफिक पोलीस वाढवण्याची मागणी म्हणजेच भ्रष्टाचार वाढविणे आपण रविवारला चिचोली फाट्याजवळ जाऊन बघा तसेच पाच साडेपाच नंतर ताडाळा रोड तेलग ची होस्टेल जवळ, टू व्हीलर वाल्यांकडून रविवारी सोमनाथला जाणारे यांना त्रास देऊन वसुलीचे काम सुरू असतात. त्यामुळे माझं असं मत आहे ट्रॅफिक पोलीस जेवढे आहे तेवढेच ठीक आहे फक्त गांधी चौकामध्ये त्यांनी प्रामाणिक काम करावं बाकी इतर ठिकाणी ट्रॅफिक पोलीस लावू नये.
Ok सोमनाथ रोड वरती दारू विक्री चालू आहे त्यावर काय कारवाई होणार आहे पोलिसाचा निदर्शनास का बर आलं नाही?
खरेच चर्चा घडवायची असेल तर खालील माहिती वाचा आत्मसात करा आणि तक्रार दाखल करा आणि न्याय मागण्यासाठी पुढाकार घ्या......
तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असून तक्रार नोंदविण्यासाठी 18002339999 हा टोल फ्री क्रमांक, 022-22660152 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा 8422001133 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संपर्क साधावा, त्याचप्रमाणे stateexcise.controlroom@gmail.com या ईमेलवर संपर्क करावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने कळविले आहे.
प्रश्न उपस्थित केला गेला आणि चर्चा सुरू झाली मात्र ती अर्ध्यातच थांबली ,हा प्रकार नेहमीच असा अर्धवट कां सोडून दिला जातो? कधितरी कुणी विचार केला आहे का? तो विचार केला जाणे आवश्यक नाही काय?
या चर्चेला सुरुवात झाल्याने एक प्रश्न उपस्थित होतो की नगरांत इतकी नोंदणीकृत दारु दुकाने असतांनाही गावाच्या एका टोकाला अशा पद्धतीने अवैधरीत्या दारु विक्री कां होत आहे?
ती अवैधरित्या होत आहे असे म्हणणे असेल तर त्याची तक्रार कां केली जात नाही? तक्रार दाखल केली असेल तर त्यावर संबंधित विभाग कार्यवाही कां करीत नाही की एखादी मोठी घटना घडण्याची कुणी वाट बघत आहेत? की अजूनही वेगळे काही कारण आहे?
आजकाल दारु विक्रेते व अवैध व्यवसाय करणारे, सामाजिक कार्यकर्ते म्हणून मानसन्मानाने विविध राजकीय, सामाजिक, व शैक्षणिक व्यासपीठावर उपस्थित राहतात आणि गौरविले जात आहेत त्याचाच तर हा परिणाम नसेल ना?
असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.
दूसरा विषय गांधी चौकातील झाडाखाली उभे राहून नेमकी शिकार हेरणारे वा पहारा देणारे रहदारी पोलिस , आणि गावाच्या वेशीवर उभे राहून वसुली करणारे हेच वाहतूक पोलिस, खरेतर या वाहतूक पोलिसांना घाबरण्याचे काही कारण नाही जर आपण नियमांचे पालन करीत गाडी चालवत असू ,मात्र आपणही कुठेतरी चुकतोच आहे , आणि म्हणूनच त्यांना संधी मिळते आणि शासनाने केलेल्या कायद्यातील तरतुदी नुसार आपण कुठेतरी चुकलेले असतो आणि कोर्टकचेरी च्या चक्रव्यूहात अडकू नये यासाठी या वाहतूक पोलिसांचे खिसे भरतो आणि मग नंतर त्याला वसूली हे गोंडस नाव देऊन त्यांचेवरच आरोप करतो.
न्यायालयाच्या एका निर्णयात नगरपरिषद , महानगरपालिका , पंचायत समिती क्षेत्रात हेल्मेट (शिरस्त्राण)घालणे बंधनकारक नाही , गाडीची कागदपत्रे सोबत असावीत परंतू नसतील तर ती २४/४८ तासात सादर करुन आपण कार्यवाही रद्द करु शकतो ,मात्र अशा तरतुदी ना कुणी समजावून सांगायला पुढे येत ना कुणी त्यांचे पालन करावे यासाठी कुठलाही प्रयत्न करताना दिसत, परिणामी कधी कायदेशीर तर कधी अवैधरीत्या आपली फसवणूक आपणच करुन घेतो ,या प्रकरणी उघडपणे कुणीही बोलत नाहीत हे सत्यही लपवून चालणार नाही .
मग उगाच चमकोगिरी करण्यासाठी कां कुणावर आरोप करायचे?आरोप केलेच तर त्यांच्या मुळाशी जाऊन पुन्हापुन्हा तीच वेळ येऊ नये यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला आहे असे एकतरी उदाहरण समोर आले आहे काय?
मग उगाच अशा चर्चा रंगवून लोकांना भ्रमीत कां करायचे? आणि चर्चा अर्धवट सोडून पलायन कां करायचे? एका पोस्टमध्ये दोन विषय आले असले तरीही त्यानिमित्ताने चर्चेत असणाऱ्या-नसणाऱ्या कित्येक प्रश्नांना उजाळा मिळाला आहे , चर्चा होणे आणि त्यावर उचित उपाययोजना सुचवून त्याची अंमलबजावणी होणार असेल तर ह्या चर्चा करण्यात काही तथ्य असणार आहे, नाहीतर....सगळाच आनंदी आनंद आहे ,मग उगाच कुणाची मते कां मोडायची आणि कुणाची मने कां दुखवायची?
*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*
*✍️Ddbatmiportalm2m✍️*




Comments
Post a Comment