मंत्रीमहोदय, या काड्या नाहीतर वास्तविकता आहे.
मंत्रीमहोदय, या काड्या नाहीतर वास्तविकता आहे.
दीपक देशपांडे
चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या विकासनिधीतून ८कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या महात्मा ज्योतिबा फुले बाजाराचे प्रदिर्घ प्रतिक्षेनंतर एकदाचे २६जानेवारी रोजी मूलमध्ये एका सोहळ्यात लोकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते ,चांगल्या कार्यात लोक काड्या अधिक करतात त्यामुळे विकासाची कामे गतीने पुर्णत्वास जात नाहीत त्यामुळे लोकांनी विकासकामांच्या बाबतीत काड्या करु नयेत ,हे वाक्य बोलताना त्यांचा रोष जरी राजकीय विरोधकांच्या उमटणाऱ्या प्रतिक्रिया लक्षात घेता व्यक्त झालेली उत्स्फूर्त अशी प्रासंगिक प्रतिक्रिया होती हे जरी मान्य केले तरीही त्या आरोपातील सत्यता पडताळून बघण्याची आज आवश्यकता निर्माण झाली आहे.
सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून मूल शहराने न भूतो न भविष्यती असा कायापालट केला आहे,हे कुणीही मान्य करणारच आहे ,विरोधकही ही बाब मान्य करतातच मात्र वास्तविकता आणि प्रत्यक्ष कृती यांचा मेळ नियोजनकर्त्याना बसवताच आला नाही हे सत्य कुणी नाकारुच शकत नाहीत.
बाजारयार्डची रचना करताना भाजी विक्रेते यांची गरज व ओट्याची रचना करताना त्याचे नियोजन सुयोग्य पद्धतीने करण्यात आले नाही अशी ओरड बांधकाम पूर्णत्वास जाण्यापूर्वीपासूनच होत होती मात्र यालाच बांधकाम करताना अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न असे संबोधून ही बाब सोयीस्कर दुर्लक्षिली गेली ,
भाजीबाजारात विक्रीसाठी येणाऱ्या व्यापारी विक्रेते यांची सुयोग्य मोजदाद यार्डचे नियोजन करताना विचारातच घेतली गेली नाही हे आज पुन्हा नोंदणी करीत मागणी करणाऱ्यांची संख्या विचारात घेता आ वासून समस्या बनून पुढे ठाकली आहे.
याच कारणामुळे मार्केट यार्ड चे लोकार्पण होऊन पंधरा दिवस लोटून गेले तरीही योग्य पद्धतीने वाटप करतांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे.पर्यायाने मागील दोन बाजार रस्त्यावर भरावा लागतो आहे ,आणि रस्त्यावरची गर्दी टाळणे अशक्य बाब ठरत आहे,आणि शेतकरी व भाजीपाला विक्रेते ओरड करु लागले आहेत व रोज नवीन समस्प्रेचे निवेदन सादर करीत नवीन मागणी पुढे येत आहे, त्यामुळे नगर प्नशासनाच्या वतीने एक खुलासा करण्यात आला आहे ,
ज्यांत प्रभारी मुख्याधिकारी यशवंत पवार म्हणतात ,
आधीच्या सर्धक्षणाल नोंदणी केलेले विक्रेते होते ७५८
नंतर आलेले १५० , याप्रमाणे
एकूण ९०८ लोकांनी जागेची मागणी केली आहे ,
मात्र प्रत्यक्षात
ओट्यावर जागा ४५×५=२२५. त्यामुळे आता मार्केट यार्डातील खुल्या जागेत वाटप करण्याचे नियोजन चालू आहे .
सर्वांना माहितीसाठी 🙏🙏
तर दुसरीकडे नियमीत बाजारात शेतमाल विक्रीसाठी आणणारे शेतकरी आम्हाला बैलगाड्यांनी शेतातील भाजीपाला विक्रीसाठी आणल्यावर स्वतंत्र जागेचे आवंटन करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे करतात ,तर भाजी विक्रेते रोजगुजरी सुद्धा एकत्रीत एकाच ठिकाणी भरविण्याची मागणी करीत आहेत . नागरिक मात्र काही भाजी विक्रेते यांना आपापल्या भागात दूकाने थाटून भाजी विक्री करु देण्याची मागणी करीत आहेत.
याचाच अर्थ मार्केट यार्डातील अपूरे ओटे ,अपूर्व व्यवस्था आणि नियोजनाचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे.परिणामी लोकांची ओरड होणे साहजिकच आहे ,याला कुणी काड्या करणे म्हणत असतील तर...?प्रत्येकालाच यांचा विचार करावा लागणार आहे. आणि ही बाब पुढे ठेवली गेली तर त्याला काड्या करणे असे म्हणायचे काय? आणि या बाबी घेऊन रोज नवी तक्रार घेऊन तुमच्याकडे यायचे काय? असाही प्रश्न शेतकरी बांधव विचारु लागले असून तुमच्यासोबत संवादासाठी पत्रकारांना माध्यम बनवून आमची समस्या तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट मत बऱ्याच शेतकऱ्यांनी आमचे सोबत बोलताना व्यक्त केले.
येत्या काही दिवसांत या ओट्यांचे वाटप होणार असून ते वाटप करतांना नियमीत भाजी विक्रेते , शेतकरी व सामान्य भाजी विक्रेते यांची सुयोग्य विभागणी करुन त्याप्रमाणे वाटप करण्याची मागणी विक्रेत्यांनी केली आहे. याशिवाय ,फळ विक्रेते , कांदे बटाटे विक्री करणारे ,कापड विक्रेते, हळद मिरची विक्रेते, लसूण विक्रेते , बांबूचे साहित्य विक्रेते , मसाल्याचे साहित्य विक्रेते ,मातीची मडके व इतर साहित्य विक्रेते, चपला विक्रेते ,व शेतातील धान्य, कडधान्य विक्रेते यांचीही योग्य पद्धतीने दखल घेतली जावी व या सगळ्यांचा गांभिर्याने विचार केला जावा अशी प्रत्येकाची आपापली समस्या आहे. आणि सणावाराला प्रासंगिक साहित्य विक्रेते व मासळी आणि मांस मटन विक्रेते यांच्याही समस्यांची सोडवणूक करावी लागणारच आहे.
यांत प्रशासनाच्या नियोजनाची व ओटे आणि जागावाटपाची खरी परीक्षाच होणार आहे,हे मात्र नाकारता येणार नाही.
या सगळ्या बाबींचा विचार झाल्याशिवाय महाराष्ट्रातील सर्वोत्तम मार्केट यार्ड म्हणून मूलचे मार्केट प्रसिद्धीस कसे येणार? आणि मंत्रीमहोदयांच्या स्वप्नातील मार्केट यार्ड प्रत्यक्षात कसे येणार?असा प्रश्न जनता विचारु लागली आहे.
*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*
*✍️Ddbatmiportalm2m✍️*


Comments
Post a Comment