*मा.ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रेरणेतून युवा क्रांती संघटना मूल ने घेतले भव्य रक्तदान शिबिर*
*मा.ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रेरणेतून युवा क्रांती संघटना मूल ने घेतले भव्य रक्तदान शिबिर*
दीपक देशपांडे
रक्तदान म्हणजे जीवनदान' असे ब्रीदवाक्य घेऊन दरवर्षी मोठ-मोठे रक्तदान शिबिरांचे आयोजन करून लाखो लोकांना जीवदान देण्याचे ईश्वरिय कार्य करणारे लोकनेते, विकासपुरुष मा. ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने आज मूल येथील कर्मवीर महाविद्यालयात आयोजित महाआरोग्य शिबिराच्या निमित्ताने मूल येथील सामाजीक कार्यात अग्रेसर असलेली युवा क्रांती संघटनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रोग निदान शिबिरातील गंभीर आजाराच्या रुग्णांच्या सर्जरीसाठी रक्ताची अत्यंत आवश्यकता असते. अशाप्रकारच्या रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होते.
मा.ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रेरणेतून समाजासाठी उपयुक्त असलेले भव्य रक्तदान शिबिर युवाक्रांती संघटना,मूल तर्फे रक्तदान हेच श्रेष्ठदान या संकल्पनेच्या विचारधारणेने एकूण ६५ रक्तदात्यांनी आपला मौलिक वेळ देऊन रक्तदान करण्याकरिता उपस्थित होऊन रक्तदान केले. या संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी युवा क्रांति संघटनेचे अध्यक्ष प्रणित पाल,निखिल वाढई,निहाल गेडाम, सूरज गेडाम ,सौरभ वायडे,सुधीर वाडगुरे,राज चिमूलवार,जितू टिंगूसले,अक्षय दुमेवार,कृष्णा बोरेवार,अंकित कटकेलवार,हेमंत सोनालकर, सोनल आगबत्तनवार यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले. या रक्तदान शिबिराला प्रमुख अतिथी म्हणुन भाजपा जिल्हाध्यक्ष मान. श्री. हरीशजी शर्मा तथा प्रमुख मार्गदर्शक म्हणून चंदू आष्टनकर व प्रशांत बोबाटे उपस्थित होते.
*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*
*✍️Ddbatmiportalm2m✍️*


Comments
Post a Comment