जमालगोट्यानंतर क्रेमाफिन, 🍳आरसा...@विनोद देशमुख
जमालगोट्यानंतर क्रेमाफिन,
🍳आरसा...@विनोद देशमुख
--------------------------------------
गेली दहा वर्षे ज्यांच्या पोटात सारखं दुखतं आणि ज्यांना अपचन, बद्धकोष्ठता यांचा वाढता त्रास आहे, अशा आपल्या "राजकीय मित्रां" ची तब्येत सुधा रावी, अशी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांची तीव्र इच्छा दिसते. म्हणूनच त्यांनी कर्पूरी ठाकूर आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या भारत रत्नाचा 'जमालगोटा' त्यांना देऊन पाहिला😀 पण, त्यानंतरही रोगी मानत नाही, असं पाहून आता त्यांनी कॉंग्रेसचे पंतप्रधान आणि काँग्रेसाध्यक्ष राहिलेले पी. व्ही. नरसिंह राव यांच्या भारत रत्नाचं 'क्रेमाफिन'च बाहेर काढलं😝 पण, एवढ्यावरच थांबतील ते मोदी कसले ? माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग आणि हरित क्रांतीचे जनक एम. एस. स्वामीनाथन् यांनाही याच वेळी भारत रत्न देऊन त्यांनी 'क्रेमाफिन प्लस' चा जालिम डोजच दिला.
😜 गेल्या तीन आठवड्यात पाच भारत रत्न जाहीर करून, एका वर्षात सर्वाधिक भारत रत्न देण्याचा विक्रमही मोदींनी स्वत: च्या नावे करून घेतला. मोदी क्या चीज है... आता त्यांच्या 'मित्रां'ना पक्कं कळून चुकलं असणार. कदाचित क्रेमाफिनमुळे त्यांची तब्येतही सुधारेल😣
ज्या नरसिंह रावांना काँग्रेसश्रेष्ठींनी सतत अपमानित केलं ते आणि ज्या अडवाणींच्या संदर्भात विरोधकांनी सतत अफवा पसरविल्या ते, अशा दोघांनाही एकाच सत्रात भारत रत्न देऊन मोदींनी मास्टरस्ट्रोकच मारला, हे कबूलच केलं पाहिजे. अडवाणींचं नाव जाहीर झालं तेव्हा घमंडिया आघाडी निराश झाली होती. आता तर त्यांच्या गोटात सुतकी वातावरणच पसरलं आहे. काय करावं या मोदींचं, हेच त्यांना कळेनासं होत असणार🤔
देशाची आणि कॉंग्रेसचीही मनोभावे सेवा करणाऱ्या नरसिंह राव यांचं पक्षानं जे भरीत केलं, त्याला हलकटपणाशिवाय दुसरं काहीच म्हणता येणार नाही🥺 निव्वळ सोनिया गांधी चाहत नाही म्हणून राव यांच्या नशिबी ही उपेक्षा आली. सोनिया का राग करायच्या ? तर, पंतप्रधान आणि काँग्रेसाध्यक्ष असताना रावांनी त्यांना मोजलं नाही, त्यांना महत्त्व दिलं नाही, त्यांच्याशी सल्लामसलत केली नाही. यावरून त्यांना बाजूला सारणं समजू शकतं. परंतु, पार्थिवाची अवहेलना ? पक्षाध्यक्ष आणि पक्षाचे पंतप्रधान राहिलेल्या रावांची तिरडी दिल्लीच्या काँग्रेस मुख्यालयाच्या आत येऊ दिली गेली नाही😥 अक्षरश: प्रवेशद्वाराशी फूटपाथवर ठेवण्यात आली आणि आतील एका कर्मचाऱ्यानं हार घातला. उदारीकरण आणून देशाची आर्थिक स्थिती मजबूत करणाऱ्या धोरणी, विद्वान, बहुभाषातज्ज्ञ स्वपक्षीय नेत्याला मरणोपरांत अशी वागणूक ? (हा अपप्रसंग सांगताना रावांचे स्वीय सचिव राम खांडेकर ढसढसा रडत असत😩) मरणान्तानि वैराणि निवृत्तं न: प्रयोजनम् ही भारतीय संस्कृतीची शिकवण विसरला का महात्मा गांधींचा काँग्रेस पक्ष ? अर्थात सोनिया गांधींच्या हाती सूत्रे असल्यावर असंच होणार. रामजन्मभूमी प्रकरणातही हेच दिसून आलं. महात्मा गांधी रघुपती राघव राजा राम... म्हणायचे. सोनिया काँग्रेसनं मात्र रामालाच काल्पनिक ठरवलं होतं.
त्याच रामाच्या अयोध्येतील मंदिराचा मार्ग मोकळा करण्यास हातभार लावणाऱ्यांमध्ये नरसिंह रावही अप्रत्यक्षपणे सहभागी होते, हेही त्यांच्या परवाच्या भारत रत्नाचं प्रमुख कारण असू शकतं. ६ डिसेंबर १९९२ रोजी कारसेवकांवर कठोर कारवाई न करून त्यांनी बाबरी मशीद पडू दिली. यानंतरच्या पहिल्याच मुलाखतीत त्यांनी स्पष्ट केलं होतंं- "दिल्लीत आमचं राज्य असलं तरी बाबरी मशीद पडली ती भाजपाचे कल्याणसिंग यांच्या (उत्तर प्रदेश) राज्यात. ही नोंद इतिहासाच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे." आता बोला.याचाच राग असू शकतो सोनियाच्या मनात. असो.
मोदींनी मात्र रावांच्या रामभक्तीचा आणि उदारीकरण निर्णयाचा, दोन्हींचा सर्वोच्च सन्मान करून काँग्रेसच्या थोबाडीत मारली. शिवाय, याच उदारीकरणाचे खरे कर्तेधर्त डॉ. मनमोहनसिंग हे सोनियांचे कठपुतळी पंतप्रधान राज्यसभेतून निवृत्त होत असताना त्यांच्या कर्तव्यनिष्ठेबद्दलही गौरवोद्गार काढले. हे दोन्ही गौरव सोनिया गांधी आणि त्यांच्या टोळक्याला पचतील का, हा आठ कोटी रुपयांचा सवाल (अ मिलियन डॉलर क्वेश्चन) आहे बघा😀
++++++++++
*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*
*✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments
Post a Comment