कृषि महाविद्यालय मूल येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्स्तव सोहळा उत्साहात साजरा

 कृषि महाविद्यालय मूल येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्स्तव सोहळा उत्साहात साजरा

दीपक देशपांडे.


            सोळाव्या शतकात परकीय हुकुमत अधिराज्य गाजवत होती.....यात एक मराठा मुठभर मावळे घेऊन हिंदवी स्वराज्याचे स्वप्न उराशी बाळगून लढतो व हिंदवी स्वराज्याची स्थापना करतो. अशा या महान राजाच्या संघर्षाची व स्वाभिमानाची महान गाथा सर्वांना कळावी या हेतूने १९ फेब्रुवारी २०२४ ला कृषी महाविद्यालय, मूल येथे छत्रपती शिवाजी महाराजांची ३९४ वी जयंती साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विष्णुकांत टेकाळे यांनी अध्यक्षस्थान भूषविले तर  प्रमुख अतिथी म्हणून श्री. नंदकिशोर कुंभारे, नायब तहसिलदार, तहसिल कार्यालय, मूल हे होते व प्रमुख वक्ते म्हणून डॉ. संतोष सुरडकर सहायक प्राध्यापक, इतिहास विभाग, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांनी छत्रपतींच्या विचारांवर प्रकाश टाकत, महाराजांसारखा वैज्ञानिक दृष्टीकोन असायला हवा तसेच छत्रपती कसे न्यायप्रिय, शेतकऱ्यांचे कैवारी, विषमतेला भेदणारे, समतेचा अग्निस्त्रोत होते या विषयी सखोल मार्गदर्शन केले. 

या प्रसंगी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विष्णुकांत टेकाळे यांनी आजच्या पिढीने शिवाजी महाराजांच्या अंगी असलेले गुण आत्मसात करावे, महिलांचा सन्मान करावा असे मत व्यक्त केले तसेच डॉ. रमाकांत गजभिये सहयोगी प्राध्यापक यांनीसुद्धा विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. 


या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व शिवगर्जनेने झाली. प्रतिक काकडे या विद्यार्थ्याने दिलेल्या शिवगर्जनेने सर्व उपस्थितामध्ये उत्साह निर्माण केला. 

या नंतर महाविद्यालयाचे विद्यार्थी रेवत ढोक, मारोती तुडमवार, चैतन्य कापगते व दिव्या मोहुर्ले यांनी शिवाजी महाराजांबद्दल आपले विचार मांडले. 


त्यानंतर सहाव्या सत्राच्या विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले तसेच आठव्या व द्वितीय सत्राच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित नाटिकेचे सादरीकरण केले. 

या कार्यक्रमास सर्व प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग व शिव जन्मोत्स्तव समिती, कृषी महाविद्यालय, मूल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. स्वप्नील देशमुख यांनी केले तसेच सूत्र संचालन कु. अंकिता कुत्तरमारे व पंकज कोरपे तर उपस्थितांचे आभार कु. श्रेया पिल्लेवान यांनी मानले. कृषी महाविद्यालय, मूल येथील सर्व प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी वृंद व विद्यार्थी यांनी कार्यक्रम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सहयोग दिला.   


                                                                  *दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.