मूल तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी राहुल मुरकुटे
मूल तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी राहुल मुरकुटे, उपाध्यक्ष रणजित समर्थ व सचिव पदी मुरलीधर चुधरी यांची निवड
मूल – न्यूज ब्युरो
मूल तालुक्यातील ग्राम पंचायत सरपंच संघटना तालुक्यातील सरपंच्यांच्या मागण्या व ग्राम पंचायती व गावाचा विकास यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा करून विकास करण्यासाठी प्रयत्न करण्याचे काम करीत असते. त्याच मूल तालुका ग्राम पंचायत संघटनेची दिनांक ०१/०२/२०२४ रोज गुरुवारला पं. स.मूल येथील सभागृहात सरपंच संघटना मूल तालुका स्तरीय नवीन कार्यकारणी गठित करण्यासाठी सभेचे आयोजन केले होते .
या सभेला मूल तालुक्यातील समस्त सन्माननीय सरपंच महोदय यांनी भाग घेतला.यात सरपंच संघटना मूल तालुका अध्यक्ष पदी श्री राहुल गजानन मुरकुटे सरपंच ग्रामपंचायत ताडाळा तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक यांची निवड करण्यात आली.तसेच उपाध्यक्ष जुनासुर्ला येथील सरपंच रंजित समर्थ, सचिव म्हणून मुरलीधर चुधरी, तर सहसचिव म्हणून उसराला महिला सरपंच प्रियंकाताई नर्मलवार, कोषाध्यक्ष्य कोमलताई रणदये, संघटक पदी सुशी येथील सरपंच अनिलभाऊ सोनुले ,कायदेशीर सल्लागार म्हणून नांदगाव सरपंच एड. हिमानिताई वाकुडकर ,तसेच सदस्य म्हणून वासुदेव वाघ,चांगदेव केमेकर,शिल्पाताई भोयर, वैशालीताई निकोडे,जस्मिताताई लेनगुरे,यशवंत खोब्रागडे आदींची कार्यकारणी सदस्य म्हणून निवड करून नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली.
सरपंच संघटनेची निवड करण्यासाठी व सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी ग्रामविस्तार अधिकारी श्री. विजय यारेवार साहेब, श्री.येरमे साहेब ग्रामविस्तार अधिकारी आकुलवार साहेब, साहरे साहेब, गजभे साहेब वरील सर्व अधिकारी उपस्थितीत राहून सहकार्य केले.नव निर्वाचित सरपंच संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, व कार्यकारिणीच्या समस्त सदस्यांचे तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच सदस्य यांनी अभिनंदन केले आहे.
*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*
*✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments
Post a Comment