तलाठी भरतीत पुन्हा गोंधळ, गुणवत्ता यादीत पुन्हा वाद, विद्यार्थी पुन्हा संभ्रमात! - अभाविप

 तलाठी भरतीत पुन्हा गोंधळ, गुणवत्ता यादीत पुन्हा वाद, विद्यार्थी पुन्हा संभ्रमात! - अभाविप 


विशेष प्रतिनिधी नागपूर.


सरळ सेवा महसूल विभाग अंतर्गत, राज्य सरकारद्वारे घेतल्या जाणारी तलाठी भरती परीक्षा दिनांक १७ ऑगस्ट २०२३ ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत टि.सी.एस मार्फत परीक्षा घेण्यात आली होती. 

हि परीक्षा तब्बल ८,६४,९६० उमेदवारांनी दिली. परीक्षेत गैरप्रकार होण्याचा आरोप स्वत: परीक्षा समन्वय समिती, पोलीस विभाग द्वारे विविध परीक्षा केंद्र असलेल्या ठिकाणी झाला आहे. 

०५ जानेवारीला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाली असता, समानीकरण करण्याच्या पद्धतीमुळे अनेक उमेदवारांचे गुण निश्चित गुणांपेक्षा जास्त वाढविण्यात आले असा आरोप उर्वरित उमेद्रारांद्रार करण्यात आला आहे. 


अभाविप विदर्भ प्रदेश मंत्री कु.पायल किनाके आपले मत व्यक्त करताना म्हणाल्या कि, या सर्व प्रक्रियेत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे विदयार्थ्यांच्या गुणांमध्ये मोठी तफावत आढळली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेच्या गुणदान प्रक्रियेवर व निकालांवर अविश्वास निर्माण झाला असून मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. अश्याच पद्धतीचे प्रकार वारंवार घडत असल्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ, पैसा विनाकारण वाया जात आहे. 

यामुळे असले गैरप्रकार पुन्हा होऊ नये व या परीक्षा प्रक्रियेतील नेमका दोष कुठे निर्माण झाला याची सत्यता बाहेर यावी याकरिता राज्य शासनाने व संबंधित विभागाने सखोल चौकशी करून विद्यार्थी हिताचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद राज्य शासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडणार! .

या आशयाचे प्रसिध्दी पत्रक अभाविप विदर्भ प्रदेश कार्यालय मंत्री देवाशिष गोतरकर यांनी नागपूर येथून प्रसिद्धीस दिले आहे.


*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.