*तुलसी रामायणातील राम या विषयावर प्रकाश एदलाबादकर यांचे व्याख्यान..*

 *तुलसी रामायणातील राम या विषयावर प्रकाश एदलाबादकर यांचे व्याख्यान..*

*अखिल भारतीय साहित्य परिषद आणि श्री जगदंबा देवस्थान समिती यांचे संयुक्त आयोजन* 


नागपूर ता ५ जानेवारी...

प्रभू रामचंद्र हे देशातील प्रत्येक भारतीयाचे दैवत आहे. अशा प्रभू रामचंद्राचे त्याच्या जन्मस्थानी म्हणजेच अयोध्येत भव्य मंदिर उभारले गेले असून त्याचे लोकार्पण येत्या २२ जानेवारी २०२४ रोजी उत्साहात केले जाणार आहे.


या निमित्ताने संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. या निमित्ताने देशात १जानेवारी ते १४ जानेवारी २०२४ या दरम्यान ठीकठिकाणी धार्मिक वैचारिक आणि सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागरण केले जाणार असून प्रभू रामचंद्राप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली जात आहे.


अखिल भारतीय साहित्य परिषद विदर्भ प्रांताच्या वतीनेही या निमित्ताने विदर्भाच्या अकराही जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. या कार्यक्रमांमधून साहित्यातील राम ही संकल्पना ठेवून जनसामान्यांना संदेश दिला जाणार आहे.


याच कार्यक्रमांच्या मालिकेत अखिल भारतीय साहित्य परिषदेची नागपूर जिल्हा शाखा आणि श्री जगदंबा देवस्थान समिती, अत्रे लेआउट, राणा प्रताप नगर, यांच्या संयुक्त विद्यमाने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. रविवार दिनांक ७ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता श्री राजराजेश्वरी सभागृह, श्री राजराजेश्वरी मंदिर, अत्रे लेआउट, राणा प्रताप नगर, नागपूर येथे साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक प्रकाश एदलाबादकर यांचे "तुलसी रामायणातील राम" या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. डॉ .पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. अ.भा. साहित्य परिषद विदर्भ प्रांत अध्यक्ष आणि ख्यातनाम साहित्यिक एड. लखनसिंह कटरे हे देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत.


या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भारतीय साहित्य परिषद विदर्भ प्रांत कार्याध्यक्ष अविनाश पाठक, संघटन मंत्री एड. सचिन नारळे, नागपूर जिल्हा अध्यक्ष डॉ. सुरुची डबीर, श्री जगदंबा देवस्थान समितीचे अध्यक्ष दिनकरराव जोशी, सचिव चंद्रकांत शाह प्रवृत्तींनी केले आहे.


*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.