अयोध्या जो कभी पराजित नही हुई* प्रकाशन सोहळा.
*माधव भांडारी लिखित अयोध्येच्या इतिहासावर प्रकाश टाकणा-या अयोध्या या ग्रंथाच्या हिंदी आवृत्तीचे नागपुरात नितीन गडकरींच्या हस्ते होणार प्रकाशन..*
*अ.भा. साहित्य परिषद विदर्भ प्रांतातर्फे आयोजन..*
नागपूर ०९ जानेवारी.. विशेष प्रतिनिधी.
प्रभू रामचंद्र हे समस्त भारतवासीयांचे श्रद्धास्थान आहे. या प्रभू रामचंद्र यांचा जन्म अयोध्येत झाला होता अशा नोंदी पौराणिक दस्तावेजात आहेत. त्यामुळेच प्राचीन काळापासून अयोध्येत प्रभू रामचंद्राचे भव्य असे मंदिर उभे राहिले होते. मात्र मोगल बादशहा बाबराच्या काळात हे मंदिर पाडले गेले आणि त्या ठिकाणी बाबरी मशीद उभी केली गेली.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुमारे ३७ वर्षांनी विश्व हिंदू परिषद आणि तत्सम हिंदुत्ववादी संघटनांनी ही मशीद पाडून इथे पुन्हा मंदिर उभारावे यासाठी संघर्ष उभा केला. १९९२ मध्ये कारासेवकांनी ही मशीद पाडली. त्यानंतर न्यायालयीन संघर्ष होऊन त्या ठिकाणी नव्याने राम मंदिर उभारले जावे असा निवाडा सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबर २०१९ मध्ये दिला. त्यानुसार तेथे भव्य असे श्री रामचंद्रांचे मंदिर जनसहभागातून उभे राहत असून तेथे येत्या २२ जानेवारी रोजी प्रभू रामचंद्राच्या मूर्तींची प्रतिष्ठापनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे.
अयोध्येतील राम मंदिराचा हा इतिहास सखोल अभ्यास करून ज्येष्ठ पत्रकार, अभ्यासक आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माधव आडारी यांनी अयोध्या या ग्रंथात शब्दबद्ध केला आहे. या ग्रंथाचे लोकार्पण २०२० मध्येच झाले. नंतर त्याची दुसरी आवृत्तीही प्रकाशित होऊन संपली. आणि आता तिसरी आवृत्ती जनता आवृत्ती म्हणून प्रकाशित होत आहे.
मूळ मराठीत असलेला हा ग्रंथ आता माधव भंडारी यांनीच हिंदीत अनुवादित केला असून हा *हिंदी* अनुवाद *अयोध्या जो कभी पराजित नही हुई* या शीर्षकाने प्रकाशित केला जात आहे.
अयोध्येच्या इतिहासावर प्रकाश टाकणारा हा हिंदी ग्रंथ येत्या १४ जानेवारी २९२४ रोजी एका शानदार समारंभात नागपुरात प्रकाशित केला जाणार आहे..
अखिल भारतीय साहित्य परिषद विदर्भ प्रांताच्या वतीने हा प्रकाशन सोहळा रविवार दिनांक १४ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता नागपुरात शंकर नगर चौकातील वोकहार्ट हॉस्पिटलच्या मागे असलेल्या साई सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्या शुभहस्ते हे प्रकाशन आणि लोकार्पण होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय साहित्य परिषदेचे राष्ट्रीय संयुक्त महामंत्री आणि ज्येष्ठ पत्रकार डॉ. पवनपुत्र बादल हे राहणार आहेत. या समारंभात स्वतः लेखक आणि अनुवादक माधव भांडारी यांच्यासह दैनिक सकाळ नागपूरचे निवासी संपादक संदीप भारंबे, अखिल भारतीय साहित्य परिषद महाराष्ट्र प्रदेशचे संघटन मंत्री नितीन केळकर हे देखील उपस्थित राहणार आहेत.
या समारंभाला नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन अखिल भारतीय साहित्य परिषद विदर्भ प्रांताचे अध्यक्ष एड.लखनसिंह कटरे, कार्याध्यक्ष अविनाश पाठक, संघटन मंत्री एड. सचिन नारळे, नागपूर जिल्हा अध्यक्ष डॉ. सुरुची डबीर प्रवृत्तींनी केले आहे.
*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*
*✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments
Post a Comment