ब्रेकिंग न्यूज, दर्जा नियंत्रण व दक्षता पथकाची स्थापना

*ब्रेकिंग न्यूज*

 *जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी स्थापन केले धान खरेदीसाठी दर्जा नियंत्रण व दक्षता पथक*


दीपक देशपांडे 


महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग,शासन निर्णय दिनांक ०९नोव्हेंबर  २०२३ मध्ये पणन हंगाम २०२३—२४ मध्ये किमान आधारभूत खरेदी किंमत योजनेअंतर्गत धान खरेदी प्रक्रियेवर संनियत्रण ठेवण्यासाठी दर्जा नियंत्रण व दक्षताा पथकाची स्थापना करण्याबाबत सूचीत केले आहे ,त्याचा आधार घेत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी तालुका स्तरावर  एका आदेश पारीत करीत एका दक्षता समितीची स्थापना केली आहे.



त्या अर्थी पणन हंगाम २०२३-२४ मध्ये चंद्रपूर जिल्हयात खरेदी करण्यात येणाऱ्या धानाचा दर्जा तपासणी करण्यासाठी व धान खरेदी प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी धान उत्पादक तालुकास्तरावर खालील प्रमाणे दर्जा नियंत्रण व दक्षता पथकाची स्थापना करण्यात येत आहे.


या पथकात तहसिलदार हे अध्यक्ष, तालुका कृषी अधिकारी सदस्य, तर निरीक्षण अधिकारी सदस्य.सचिव असणार आहेत.


वरील दर्जा नियंत्रण व दक्षता पथकाने विशेष मोहिम राबवून त्यांचे तालुक्यांच्या अधिनस्त धान खरेदी केंन्द्राचा व धान साठवणूकीचा गोदामांना अचानक भेटी देवून धानाची पाहणी करायची आहे.


त्यात

*दर्जा नियंत्रण व दक्षता पथकांची कार्य*:- सुद्धा नमूद करण्यात आली आहेत.


अ) खरेदी करण्यात येणारे धान्य हे एफ. ए.क्यू दर्जाचे असल्याची खातरजमा करणे.

आ) शेतकऱ्यांच्या पिक उत्पादकांच्या प्रमाणात धान खरेदी होत असल्याबाबत खातरजमा करणे.

इ) धान खरेदी केंद्रावर व गोदामामध्ये नवीन एफ एक्यू धानखरेदी/साठवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास तसेच शेतकऱ्यांच्या पिक उत्पादन क्षमतेपेक्षा ज्यादा धानाची खरेदी असल्याचे या शेतकऱ्यांऐवजी व्यापारी/दलाल/निदर्शनास आल्यास मध्यस्थांकडून धान खरेदी होत असल्याचे त्यासाठी जबाबदार असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती दर महा या कार्यालयास सादर करणे.

ई) बाहेरील राज्यातील धान खरेदी केंद्रावर विक्री करण्याकरिता येत नसल्याचाबाबत खातरजमा करणे.

यांसारखी कामे करावयाची आहेत.

असे जिल्हा पुरवठा अधिकारी अजय चरडए यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे आदेशाचा उल्लेख करीत केले आहे. या आदेशामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळणार असून शेतकरी व धान उत्पादक ग्राहकांची फसवणूक टाळता येणार असून योग्य न्याय मिळण्याच्या मार्ग मोकळा होणार आहे.


*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.