२० *आणि* २१ **जानेवारी* *महाराष्ट्र* *राज्य* *शिक्षक* *परिषदेचे* *चंद्रपूर* *येथे* *जिल्हा* *अधिवेशनाचे* *आयोजन* .
चंद्रपूर न्यूज ब्युरो
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चंद्रपूर च्यावतीने प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, नगरपरिषद, अपंग समायोजित जि.प.प्राथमिक, खाजगी ,आदिवासी आश्रमशाळा, काॅव्हेट शाळा इत्यादी विभागाचे संयुक्त चंद्रपूर जिल्हा अधिवेशन दिनांक २० आणि २१ जानेवारी २०२४ ला श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृह चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले आहे.
या अधिवेशनाचे रीतसर उद्घघाटन २१ जाणेवारी ला सकाळी ११ वाजता होणार आहे.
*उद्घघाटक* - ना.सुधिरभाऊ मुनगंटीवार,वने व सांस्कृतिक कार्यमंत्री,म.रा.
*अध्यक्ष* - विलास खोंड चंद्रपूर जिल्हाध्यक्ष,
*स्वागताध्यक्ष* - देवराव भोंगळे माजी जि.प.अध्यक्ष .
*प्रमुख* *मार्गदर्शक* - नागो गाणार माजी शिक्षक आमदार नागपूर विभाग.
*विशेष* *अतिथी* - वेणुनाथ कडु राज्य अध्यक्ष, राजकुमार बोनकिले राज्य सरकार्यवाह, सौ.पुजाताई चौधरी राज्य महिला आघाडी प्रमुख, प्रकाश चुनारकर राज्य कार्याध्यक्ष ( प्राथमिक) , अजय वानखेडे नागपूर विभाग अध्यक्ष, सुभाष गोतमारे कार्यवाह नागपूर विभाग, संतोष सुरावार कोषाध्यक्ष नागपूर विभाग,विनोद पांढरे उपाध्यक्ष नागपूर विभाग, मधुकर मुप्पीडवार उपाध्यक्ष नागपूर विभाग, रामदास गिरटकर संघटन मंत्री नागपूर विभाग, दिलीप मॅकलवार कार्यवाह जिल्हा चंद्रपूर, सौ.कल्पनाताई चव्हाण शिक्षणाधिकारी चंद्रपूर, राजकुमार हिवारे शिक्षणाधिकारी प्राथमिक, कु.संध्याताई गिरटकर महिला आघाडी प्रमुख, विवेक आंबेकर काॅन्व्हेंट विभाग प्रमुख, *प्रमुख* *उपस्थिती* -- देवेंद्र कंचर्लावार अध्यक्ष चंद्रपूर शहर ,सौ.सरिताताई सोनकुसरे जिल्हा अध्यक्ष प्राथमिक, अमोल देठे जिल्हा अध्यक्ष जि.प.विभाग.
आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
अधिवेशनातील मुख विषय.
(१) सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे.
(२) घोषित व अघोषित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व तुकड्या तसेच नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांना प्रचलित नियमानुसार अनुदान देणे.
(३) शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना सेवा संरक्षण देणे.
(४) चतुर्थ श्रेणी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पद पूर्ववत करणे.
(५) अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्णवेळ ग्रंथपालांचा दर्जा देणे.
(६) रात्रशाळेतील शिक्षकांना पूर्णवेळ शिक्षकांचा दर्जा देणे.
(७) बीएलओ, जनगणना व ईतर अशैक्षणिक कामे शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न देणे.
(८) वरिष्ठ व निवड श्रेणी विना अट सरसकट लागू करणे.
(९) एम.ई.पी.एस. नुसार काॅन्व्हेंट शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सर्व लाभ मिळणे.आणी अनेक विषय चर्चेला जाणार आहे.
(10) संघटनेचे सेवानिवृत तालुका आणि जिल्हा पदाधिकारी तथा मान्यवरांचा सत्कार सोहळा.
तरी या अधिवेशनाला जिल्ह्यातील सर्व प्राध्यापक,शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अधिवेशनाचे संयोजक विवेक आंबेकर, सहसंयोजक वसंत वडस्कर, जिल्हाध्यक्ष विलास खोंड, जिल्हाकार्यवाह दिलीप मॅकलवार, व इतर पदाधिकारी यांनी केले आहे.
*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*
*✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments
Post a Comment