विदर्भभुमीत साकारलेला पहिला हिंदी चित्रपट,बेबस
विदर्भभुमीत साकारलेला पहिला हिंदी चित्रपट, बेबस!
दीपक देशपांडे
लोक जीवाची मुंबई करीत सिनेसृष्टीत दाखल होण्यासाठी मुंबई कडे आकर्षित होत असताना सोयीसुविधांचा अभाव जाणवू न देता, सगळ्यांच्या इच्छाशक्तीच्या भरवशावर विदर्भाच्या मातीतील कलावंतांना सोबत घेत मूलच्या परिसरात स्थानिक कलावंतांना सोबत घेऊन चित्रपट साकार केला असल्यांने, बेबस हा विदर्भ भुमीतील पहिला चित्रपट सर्वांनी बघावा, असे आवाहन या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, लेखक आणि कलावंत कृपाल लांजे यांनी केले.
कलाकार हा गरीब वा श्रीमंत घरात जन्म घेतो असे नाही तर तो कुठेही जन्म घेऊ शकतो , फक्त त्याला साथ व संधी मिळाली की त्याचे सोने करतो हेच या चित्रपटाच्या निमित्ताने स्पष्ट झाले असल्याचे स्पष्ट करीत चित्रपट,त्यातील कथानक , चित्रीकरणासाठी निवडलेले स्थळ कलाकारांची निवड , प्रत्येकाने दिलेले योगदान ,वेळेचे नियोजन ,करावी लागलेली धडपड याबाबत सविस्तर माहिती याप्रसंगी आयोजकांनी दिली.
प्रेस क्लब मूलच्या सदस्यांना विश्राम गृह मूल येथे आमंत्रित करून बेबसच्या कलाकार मंडळींनी आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेतून त्यांनी हे आवाहन केले. यावेळी पत्रकार परिषदेला बेबस चित्रपटात काम करणाऱ्या कलावंतांची उपस्थिती, विश्वास आणि आनंद त्यांच्या मेहनतीचे चीज झाल्याचे स्पष्ट करीत होते.
आपण बालपणापासूनच नाट्यकलावंत असल्याने, अभिनय क्षेत्राकडे आपली ओढ होतीच ,पण ती साकार करण्याची योग्य संधी मिळत नव्हती ,
अनेक छोट्या नाटकात काम करतांना, झाडीपट्टीतील समृध्द अभिनयाला न्याय मिळत नसल्याची,ती देता येत नसल्याची खंत होती, ही खंत भरून काढण्यांची मनात कल्पना होती, त्यासाठी (शार्ट फिल्म)लघू चित्रपट काढतांना अनेक कलावंत भेटले , त्यांचे सोबत १०-१२ लघूचित्रपट काढतांना आणि त्यांच्या मैत्रीतून व चर्चेतून निर्माण झालेला विश्वास या बेबसच्या निमीत्ताने साकार करता आला, असे कृपाल लांजे यांनी एका प्रश्नाचे उत्तरात स्पष्ट केले.
बेबस हा सामाजीक हृदृयस्पर्शी चित्रपट आहे, तो सगळ्यांनी कुटूंबासह पाहण्यासारखा आहे, येत्या १२ जानेवारीला विदर्भातील मूल, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, ब्रम्हपुरी , गोंदिया तिरोडा ,साकोली येथील आठ ठिकाणी चित्रपटगृहात हा सिनेमा प्रदर्शीत होणार आहे.
मुलत: पूर्णपणे विदर्भात तयार झालेला हा पहिलाच हिंदी चित्रपट असल्यांची माहीती देताना या चित्रपटाचे चित्रीकरण मूल शहरातील विविध भागासह ,मूल तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी चित्रीकरणाचा फारसा अनुभव व साधनसामग्री उपलब्ध नसतांना चित्रीकरण करण्यात आले आहे.
केवळ दिड वर्षात साकारलेला,*बेबस* ज्यात विदर्भातीलच १५० कलावंत असून या बेबसमध्ये ४ गाणी सुध्दा चित्रीत केल्याचे कृपाल लांजे यांनी सांगीतले.तर चित्रपटाचे चित्रीकरण झाल्यानंतर त्याचे संपादन, गडचिरोली व नागपूर येथे करण्यात आल्याचे सांगितले.
चित्रपटाला केंद्रिय सेंसार बोर्डाची परवानगी मिळविण्यासाठीचे एकेक अनुभव विलक्षण असल्यांचे त्यांनी सांगीतले तर चंद्रपूर—गडचिरोली जिल्हयातील कलावंत एवढा दर्जेदार सिनेमा बनवित असल्यांने सेंसार बोर्डाचे सदस्यांनी स्टॅंडीग ओवेशन देत आमचा उत्साह वाढविल्याचे व त्यामुळे भारावून गेल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले.
खरेतर मूलचे नागरिक हे आमचे खरे प्रेरणास्रोत आहेत कारण त्यांनी शार्टफिल्मला दिलेला प्रचंड प्रतिसाद आम्हाला ही कलाकृती सादर करण्यासाठी प्रेरणादायी ठरली आणि त्यांच्या यशाने आज हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.असेही एका प्रश्नाच्या उत्तरात आवर्जून स्पष्ट केले.
चित्रपटाची तिकीट विक्री सुरू असून, नागरीकांनी आपल्या मातीतील कलावंतानी साकार केलेली कलाकृती व अभिनय पाहण्यासाठी हा चित्रपट आवर्जुन पहावा असे आवाहन बेबसच्या कलावंतानी या पत्रपरिषदेतून केले आहे.
बजेटचा फारसा लेखाजोखा न ठेवता एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ या न्यायाने कुणा एकावर संपूर्ण भार न टाकता ह्या चित्रपटाची निर्मिती केली असल्याने भविष्यात यांची इतिहासात नोंद घ्यावी लागेल असेही स्पष्ट करीत *नो बजेट* चित्रपट असल्याचे सांगितले.
आजपर्यंत मुंबईच्या दिशेने धाव घेणारी कलावंत मंडळी भविष्यात मूलच्या दिशेने आकर्षित झाली तर त्याचे आश्चर्य वाटायला नको असा आमचा हा चित्रपट तयार करताना आलेला अनुभव असल्याचेही स्पष्ट करताना भविष्यात हाॅलीवूड ,बाॅलिवूड सारखे मूलवूड म्हणून मूलची ओळख व्हावी ही आमची इच्छा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेला बेबस चित्रपटात काम करणारे लेखक, दिग्दर्शक , निर्माते कृपाल लांजे, आशुतोष सादमवार , अनिरुद्ध सादमवार ,सचिन गेडाम, प्रभाकर भोयर , विनोद बोलीवर , प्रफुल्ल येलचलवार , संतोष कुमार, निलेश जंपलवार,सुनील कुकुडकार , यांचेसह महिला कलाकार कुमुदिनी भोयर, कृष्णा सुरमवार आणि बालकलाकार आदी उपस्थित होते.
भविष्यात *झेप* नावाने मराठी चित्रपट प्रदर्शित करण्याचा व आजच्यापेक्षा वेगळे काही देण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले ,मात्र त्याची कथा वा लेखन अजून सुरू झालेले नसल्याचेही आवर्जून स्पष्ट केले.
*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*
*✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments
Post a Comment