अध्यक्षपदी श्रीकृष्ण गोरे तर सचिव पदी एजाज अहमद यांची निवड



*राजुरा पत्रकार असोसिएशनची नवीन कार्यकारणी गठित 

;  *अध्यक्षपदी श्रीकृष्ण गोरे तर सचिव पदी एजाज अहमद यांची निवड*

उपाध्यक्ष संताष कुंदोजवार, प्रा. प्रफुल शेंडे यांची निवड*

राजुरा : न्यूज ब्युरो.

राजुरा पत्रकार असोसिएशन राजुराच्या कार्यकारणीचा तीन वर्षाचा कार्यकाल संपल्याने नविन कार्यकारणीची निवड करण्यासाठी नुकतीच निवडणूक घेण्यात आली. यात अध्यक्षपदी श्रीकृष्ण गोरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली तर सचिव पदी एजाज अहमद यांची निवड करण्यात आली.


राजुरा पत्रकार असोसिएशनच्या कार्यकारणीचा कार्यकाल संपल्याने नविन कार्यकारणीची निवड करण्यासाठी नुकतीच शासकीय विश्रामगृह राजुरा येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत ठरल्याप्रमाणे बिनविरोध निवडणूक घेण्यात आली यात अध्यक्षपदासाठी श्रीकृष्ण गोरे यांचे सर्वानुमते नाव समोर आल्याने त्यांची एकमताने निवड करण्यात आली.

 सचिव एजाज अहमद, कार्याध्यक्ष मंगेश बोरकुटे, उपाध्यक्ष संतोष कुंदोजवार, प्रा. प्रफुल शेंडे, कोषाध्यक्ष सय्यद जाकीर, सहसचिव साहील सोळंके तर कार्यकारणी सदस्य म्हणून वसंत पोटे, मनोज आत्राम, फारुख शेख, शहनवाज कुरेशी, अमीत जयपूरकर, सागर भटपल्लीवार, उमेश मारशेट्टीवार, मंगेश श्रीराम, बंडू वनकर, प्रकाश काळे, प्रेस फोटोग्राफर अविनाश दोरखंडे यांची निवड करण्यात आली. नविन कार्यकारणीच्या निवडीबद्दल शहरातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात आले.

*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.