अपप्रचाराचं तोंड काळं! आरसा...@विनोद देशमुख
अपप्रचाराचं तोंड काळं,
🍳आरसा...@विनोद देशमुख
असं काय आहे या व्हिडिओत ? नवं मंदिर मूळ रामजन्मभूमीच्या जागेवर उभारलेलंच नसून, ३ कि. मी. दूरवरच्या जागेवर आहे, असा दावा या व्हिडिओतून करण्यात आला आहे. फॅक्ट चेक मध्ये तो खोटा सिद्ध झाला. परंतु, मंदिराबद्दल संभ्रमावस्था निर्माण व्हावी या दुष्ट हेतूनं कोणीतरी मुद्दाम हे घडवून आणलं आहे. म्हणूनच हे कटकारस्थान उघड करून संबंधितांना आयुष्यभरासाठी अद्दल घडविली पाहिजे, एवढा मोठा रामद्रोह (म्हणजेच देशद्रोह) त्यांनी केला आहे.
मुस्लिम स्कॉलर म्हणवणारे फर्जिल अहमद यांची एका चॅनेलवरील मुलाखत या व्हिडिओत आहे. वरील दावा त्यांनी अतिशय थंड डोक्यानं, कुठलाही संताप व्यक्त न करता, पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांची तारीफ करत अशा रीतीनं केला की, पाहणाऱ्याला ते खरंच वाटावं😩 यामागचा त्यांचा हेतूही स्पष्ट आहे. बाबरी मशिदीच्या जागीच रामजन्मभूमी होती, तरी ती जागा आज रिकामी आहे. म्हणून ही जागा आम्हाला द्यावी, म्हणजे तेथे छोटीशी मशीद आम्ही बांधू, अशी मागणी त्यांनी केली आहे. "मंदिर वही बनाएंगे" हीच तर रामजन्मभूमी आंदोलनाची टॅगलाईन होती आणि समस्त रामभक्तांची भावना होती. त्यांच्या मनात चलबिचल निर्माण करण्याचा अंतस्थ हेतूही या व्हिडिओतून स्पष्ट दिसतो. याच्या परिणामी देशभरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली, तर ती अनेकांना हवीच आहे. यावरून या कटाचं लक्ष्य कोणाच्याही सहज लक्षात यावं.
वादग्रस्त बाबरी मशिदीची एकूण जागा २.७ एकर आहे. ३० सप्टेम्बर २०१० रोजी अलाहाबाद हायकोर्टानं याचे तीन समान भाग (प्रत्येकी ०.९ एकरचे) करून, ते रामलला विराजमान, निर्मोही आखाडा आणि सुन्नी वक्फ बोर्ड या तीन पक्षांना देण्याचा निर्णय दिला होता. असं विभाजन तिघांनाही अमान्य असल्यानं ते सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टानं ९ नोव्हेंबर २०१९ रोजी या प्रदीर्घ खटल्याचा अंतिम निर्णय देताना बाबरी मशिदीची संपूर्ण २.७ एकर जागा रामजन्मभूमी मंदिरासाठी ट्रस्टला दिली आणि त्या बदल्यात सुन्नी वक्फ बोर्डाला दूर अंतरावर ५ एकर जागा मशिदीसाठी देण्याचा सरकारला आदेश दिला. सध्याच्या ट्रस्टने याच २.७ एकरवर मंदिराच्या बांधकामाचा आराखडा तयार केला. त्यानुसार, मंदिराचं एकूण बांधकाम ५७४०० वर्गफूट, लांबी ३६० फूट, रुंदी २३५ फूट, उंची १६१ फूट, मजले ३, तळमजल्यावर १६० स्तंभ, पहिल्या मजल्यावर १३२ आणि दुसऱ्या मजल्यावर ७४ स्तंभ आणि एकूण प्रवेशद्वार १२ अशी योजना ठरविण्यात आली. त्याबरहुकुमच पहिला टप्पा पूर्ण झाला असून, त्याचं लोकार्पण (रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा) २२ जानेवारीला उत्साहात होत आहे. त्याला गालबोट लावण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणजेच हा व्हिडिओ🥺
या व्हिडिओत अहमद सांगत आहेत- "मंदिर प्रकल्प भव्य असल्यानं बाबरीच्या जागेवर होणे शक्य नाही. म्हणून ट्रस्टनं ३ कि. मी. दूर असलेल्या जागेवर सध्याचं मंदिर बांधलं आहे. ही जागा काँग्रेसचे पी. व्ही. नरसिंहराव पंतप्रधान असताना त्यांच्या सरकारनं ट्रस्टला दिली होती. (सध्याचा ट्रस्ट सुप्रीम कोर्टाच्या आदेशान्वये नव्यानं स्थापन झालेला आहे.) पण, याला कुठलाही पुरावा सापडत नाही. तरीही ठोकून देऊन जनतेला भ्रमित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. म्हणजे हा कटच होता.
बोलघेवडे विश्वप्रवक्ते संजय राऊत, काँग्रेसचे दिग्गीराजा यांनी हा मुद्दा लावून धरण्याचा प्रयत्न केला, तेव्हा स्वत: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केलं की, बाबरी मशिदीच्या मधल्या घुमटाखाली जेथे रामलला विराजमान होते, तेथेच मंदिराचा गाभारा आहे. तेव्हा कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. आता, ही अफवा पसरविण्यात सहभागी सर्वांना योगीजींनी त्यांच्या 'ख्याती'ला साजेसा दंड द्यावा, ही समस्त रामभक्तांची अपेक्षा राहील.
दरम्यान, द क्विंट या प्रसारमाध्यमानं या व्हिडिओतील गूगलच्या नकाशाचा फॅक्ट चेक केला, तेव्हा नकाशात हेराफेरी केलेली आढळली. व्हिडिओतील नकाशात बाबरी मशिदीपासून राम मंदिर 3 कि. मी. वर दाखविण्यात आलं आहे. प्रत्यक्षात मंदिर मूळ जागेवरच आहे. बाबर (बाबरी नव्हे) मशीद म्हणून दाखविण्यात आलेली वास्तू मशीद नसून एक मंदिरच आहे😜🙏 म्हणजे, कट करणाऱ्यांनी प्रेक्षकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा पद्धतशीर प्रयत्न ठरवून केलेला दिसतो. पण तो सुदैवानं लवकर उघडकीस आल्यानं फसला आणि मोठं विघ्न टळलं. रामललाची कृपाच🙏
++++++++++
*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*
*✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments
Post a Comment