मूल तालुका पत्रकार संघाने मूलच्या प्रशासनातील प्रमुख अधिकारी एका मंचावर एकवटले*

*अपयशाने खचून जाऊ नका, अभ्यासात सातत्य ठेवा ,यश निश्चित मिळणार- मान्यवरांचा  सूर*

मूल:-दीपक देशपांडे.*


विद्यार्थ्यांनी  आधी आपले ध्येय निश्चित करुन मगच आपल्या आवडीच्या क्षेत्राकडे वाटचाल करावी., त्यासाठी ध्येय, चिकाटी आणि आत्मविश्वास महत्वाचा आहे.,तसेच भरपूर मेहनतीची सुद्धा  विद्यार्थ्यांनी तयारी आणि सातत्य ठेवणे गरजेचे आहे असे प्रतिपादन तहसिलदार डॉ.रविंद्र होळी यांनी  केले.*


मूल येथिल कर्मवीर महाविद्यालयाच्या सभागृहात  मूल तालुका पत्रकार संघ आणि कर्मवीर महाविद्यालय,मूल यांच्या संयुक्त विद्यमाने १५ जानेवारी रोजी करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 


कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी मूलचे तहसिलदार डॉ.रविंद्र होळी होते.  प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शक म्हणून नायब तहसिलदार तथा  मूल नगर पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी यशवंत पवार,मूल पंचायत समितीचे संवर्ग विकासअधिकारी बी.एच.राठोड,पोलिस निरिक्षक सुमित परतेकी,नायब तहसिलदार ओंकार ठाकरे, कर्मवीर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.अनिता वाळके,मूल तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू गेडाम यांची प्रमूख उपस्थिती होती.


 तहसिलदार डॉ.होळी पुढे म्हणतात , विद्यार्थ्यांनी कोणतेही काम मन लावून करावे.स्पर्धा परिक्षेची तयारी करताना अभ्यासातील छोट्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे.,पुस्तक वाचनासोबतच  वृत्तपत्र  वाचनाची सवय लावून  घेणे आवश्यक असल्याचे सांगताना त्यातील नेमकं काय वाचायचे आणि काय नाही हे विद्यार्थ्यांना समजले पाहिजे. 

सतत हातात असणाऱ्या मोबाईलचा वापर कसा आणि  कशासाठी करावा हे लक्षात घेऊन सोशल मिडीयाचा वापर कमी करावा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. वेगवेगळी उदाहरणे देत त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व  आणि त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा असावा ह्यावर स्पष्ट विवेचन केले.


 या करीअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे पहिले पुष्प गुंफताना , नायब तहसिलदार ओंकार ठाकरे  यांनी स्पर्धा परिक्षेत सहभागाची आवश्यकता  व यश संपादन करून अधिकारी होण्याची जिद्द विद्यार्थ्यांनी बाळगली पाहिजे असे मत  यावेळी व्यक्त केले. 


आपले  करिअर घडवितांना आणि स्पर्धा परिक्षेसाठी वर्तमानपत्राचे महत्व अनन्यसाधारण आहे. असे मत व्यक्त करीत स्वानुभव कथन करताना , आपले ध्येय ठरविले गेले पाहिजे ,व त्यानुसार ते आचरणात आणले पाहिजे मग परिस्थिती कशीही असली तरी पुढचा मार्ग गवसतो असे मत संवर्ग विकास अधिकारी बी.एच.राठोड यांनी व्यक्त केले. 


अपयशाने खचून न जाता  स्पर्धेत सहभागी झाले पाहिजे , त्यासाठी स्पर्धा परिक्षांना सामोरे गेले पाहिजे.संघर्ष करा आणि जीवन घडवा.अभ्यासात सातत्य ठेवा.यश निश्चित तुमच्या पदरात पडेल असा आशावाद नायब तहसिदार तथा मुख्याधिकारी यशवंत पवार यांनी आपल्या बाणेदार शैलीत व्यक्त केला.


 स्वतः वर विश्वास ठेवा आणि अभ्यासात सातत्य ठेवण्याचे आवाहन पोलिस निरिक्षक सुमित परतेकी यांनी केले.


क्षेत्र कोणतेही असू द्या ,मनाची तयारी आणि आत्मविश्वासाने, कुठल्याही क्षेत्रात करिअर करता येते.,ते कमी अथवा अधिक महत्त्वाचे नसते तर ते आपल्या यशावर अवलंबून असते,त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्यााचे मत प्राचार्या डॉ.अनिता वाळके यांनी व्यक्त केले.


करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाची प्रस्तावना अध्यक्ष राजू गेडाम यांनी विशद केली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन दीप प्रज्वलन करण्यात  आले. कार्यक्रमाचे संचालन पत्रकार संघाचे सचिव विनायक रेकलवार यांनी केले.तर आभार उपाध्यक्ष युवराज चावरे यांनी मानले. सरस्वती स्तवन अशोक येरमे यांनी सादर केले. पुष्पगुच्छ देवून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला पत्रकार संघाचे जेष्ठ सदस्य प्रा.चंद्रकांत मनियार,दीपक देशपांडे, अशोक येरमे, आणि  कर्मवीर महाविद्यालयाचे प्रा.दहिवले, प्रा.लेनगूरे, प्रा.चन्ने,प्रा.डॉ.कराडे, प्रा.शेलोकर, प्रा.आगलावे,प्रा.उपरे, प्रा.बनकर, प्राध्यापिका हांडेकर, तसेच विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठया संख्येने  उपस्थित होते.


*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.