जयंती उत्सव व अभिवादन.
राजमाता जिजाऊ जन्मदिनी महावितरण तर्फे अभिवादन तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंती प्रित्यर्थ अभिवादन करण्यात आले
चंद्रपूर , न्यूज ब्युरो
राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले. त्यांनी स्वराज्य निर्माण करण्याचा प्रचंड आत्मविश्वास शिवरायांमध्ये निर्माण केला. त्यांच्या जयंतीनिमित्त महावितरण चंद्रपूर परिमंडळाद्वारे विनम्र अभिवादन करण्यात आले
तसेच
योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद यांनाही त्यांच्या जयंतीनिमित्त आज चंद्रपूर परिमंडळात सर्वत्र अभिवादन करण्यात आले.
सहा.महाव्यवस्थापक श्री.रामचंद्र वैदकर, यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून आदरांजली वाहिली, तर उपकार्यकारी अभियंता कांचन झेले यांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली वाहिली.
याप्रसंगी,वरिष्ठ व्यवस्थापक सुशिल विखार, उपविधी अधिकारी श्री. शैलेंद्र फुले, व्यवस्थापक (वि व ले ) श्री सचिन जीवणे, श्री. भूपाल बेडेकर, श्री प्रदीप जिंदे, सहा अभियंता - श्री.अमोल पिंपळे व नगराळे, श्री. कुरेकार,श्री. पाटील, श्री. साखरकर, श्री. ठाकरे. श्री. शिरपूरकर, श्री ताजने, श्री शेडामे, श्री खोंड, चाचेरकर व रोशनी वंजारी,शारदा नारे, सविता भजभूजे, उपस्थित होते.
सर्व उपस्थितांनी स्वामी विवेकानंदव राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण व आदरांजली अर्पण केली.
*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*
*✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments
Post a Comment