उद्या पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार राजुऱ्यात.

 उद्या पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार राजुऱ्यात. 


राजुरा पत्रकार असोसिएशन द्वारा पत्रकार दिन सोहळ्याचे आयोजन.

राजुरा ,न्यूजब्यूरो

राजुरा पत्रकार असोसिएशन राजुरा द्वारा उद्या दिनांक ६ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी संकुल राजुरा येथे पत्रकार दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी राजुरा तालुक्यात विशेष कामगिरी करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. 

         कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे वने  सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाषभाऊ धोटे, विशेष उपस्थिती माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी विजय गौडा, अप्पर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजसिंह पवार, पोलीस निरीक्षक प्रशांत साखरे, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रीना जनबंधू, तहसीलदार हरीश गाडे, गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे, वनपरिक्षेत्र अधिकारी देवराव पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयप्रकाश आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 



        या प्रसंगी राजुरा तालुक्यात आपापल्या क्षेत्रात विशेष कामगिरी केल्याबद्दल उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नाईक, कर निरीक्षक मोनिका राजगडकर, सकाळचे ज्येष्ठ पत्रकार आनंद चलाक, गटशिक्षणाधिकारी मनोज गौरकार, नेत्रचिकित्सक शंकरराव बुरान, तहसीलदार डॉ. रवींद्र होळी, उद्योग निरीक्षक निरंजना भोयर, दैनिक महाविदर्भ चे ज्येष्ठ पत्रकार बाबा बेग, बगलवाडी येथील शीला जाधव आदी मान्यवरांचे सत्कार करण्यात येणार आहे. 

       या पत्रकार दिन सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राजुरा पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष एजाज अहमद, सचिव श्रीकृष्ण गोरे, सदस्य सागर भटपल्लीवार, संतोष कुंदोजवार, फारुख शेख, सय्यद जाकीर, मंगेश बोरकुटे, अमित जयपुरकर, प्रा. प्रफुल्ल शेंडे, मनोज आत्राम, साहिल सोळंके, शहानवाज कुरेशी, बंडू वनकर, मंगेश श्रीराम, वसंत पोटे, उमेश मारशेट्टीवार, अविनाश दोरखंडे आदींनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.