गाडगेबाबाच्या शैक्षणिक विचारातून समाजात क्रांती झाली* .... *मा. दिलीप सोळंके*

 गाडगेबाबाच्या शैक्षणिक विचारातून समाजात क्रांती झाली* .... *मा. दिलीप सोळंके*

ऊर्जानगर (चंद्रपूर):-न्युजब्युरो.

 वैराग्यमुर्ती गाडगेबाबानी किर्तनाच्या माधमातून शिक्षणाचे महत्व सांगितल्यावर बहुजन समाज शिक्षणाकडे वळला. संत कोणाला म्हणावे याबाबत सखोल विचार प्रकट केले. शिक्षणाशिवाय समाजाचा तारनोपाय नाही. गाडगेबाबांनी कीर्तनातून सांगितलेल्या शैक्षणिक विचारातून बहुजन समाजात शिक्षणाची क्रांती झाली असे विचार दिलीप सोळंके यांनी मांडले ते श्री गुरूदेव सेवा मंडळ, ऊर्जानगरच्या वतीने "स्नेहबंध" सभागृह येथे वंदनिय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजाचा ५४ व्या व वैराग्यमुर्ती संत गाडगेबाबांचा ६६ व्या स्मृतीदिन महोत्सवा निमित्य आयोजित व्याख्यानमाला कार्यक्रमात बोलत होते. 

कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत अध्यक्ष प्रशांत दुर्गे यांनी मंडळातर्फ राबविलेल्या वर्षभरातील विविध उपक्रमाची माहिती दिली. महिला व पुरूष गटाची राज्यस्तरीय भजन स्पर्धेकरीता निवड झाल्याची माहिती दिली. अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष अशोकराव धामणे होते. उपस्थित मान्यवराच्या हस्ते उदघाटन झाले. 

मुख्य वक्ते म्हणुन प्रा. डॉ रत्नाकर भेलकर, नागपूर आणि दिलीप सोळंके अमरावती हे लाभले होते. चं म औ वि केंद्राचे वित्त व लेखाचे वरिष्ठ व्यवस्थापक सुधाकर काकडे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अविनाश चव्हाण, मंडळाचे अध्यक्ष प्रशांत दुर्गे, सेवाधिकारी शंकर दरेकर,मा. खरवडे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत व्याख्यानमाला पार पडली. 

राष्ट्रसंत साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ रत्नाकर भेलकर, नागपूर यांनी राष्ट्रसंताच्या ग्रामगीतेतील परंपरा आणि वास्तविक स्थिती यावर सविस्तर माहिती देताना सांगितले की, ग्रामगीता ही भारतीय परंपरेच्या जवळ जाते. ग्रामगीतेची उपलब्धता वंचिताकडे वळलेली आहे. ग्रामगीतेत सामाजिक, शैक्षणिक, सामाजिक आर्थिक, वैश्विक, भक्तीधारा, ध्यान, धर्म आणि धारणा, विश्वात्मक दृष्टीकोन आहे. ग्रामगीता ही मानसिक व सामाजिक उत्क्रांती आहे. ग्रामगीतेत आदर्श कल्याणकारी राज्याची संकल्पना आहे. ग्रामगीता ही बहुविध विद्याशाखीय आहे.तार्रकिक दृष्टीकोन व स्वच्छता याचे भान ग्रामगीतेत आहे.साहित्य निर्मितीच्या माधमातून भेलकर सर राष्ट्रसंताचे कार्य सातासमुद्रापलीकडे नेत आहेत. 

प्रमुख पाहुणे सुहास जाधव, सुधाकर काकडे, यांनी राष्ट्रासंताचे विचार मांडले. अध्यक्षिय भाषणात अशोक धामणे यांनी तुकडोजी, तुकारामदादा व लक्ष्मनदादा नारखेडे यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. आपण राष्ट्रसंतांच्या विचाराने एकञ आलो तरच गावाचा देशाचा विकास होईल असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सुञसंचालन कोषाध्यक्ष खेमदेव कन्नमवार यांनी केले तर आभार प्रसिद्धी प्रमुख मधुकर दुफारे यांनी मानले. शेवटी राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली. 

-------

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.