मूल तालुक्यातील गुणवंतांचा अभिनंदनीय चढता आलेख*
*मूल तालुक्यातील गुणवंतांचा अभिनंदनीय चढता आलेख*
दीपक देशपांडे.
मूल शहर तसे आजही उच्च शिक्षणापासून दूरच मात्र या शहरातील गुणवंतांची गरुडझेप मोठमोठ्या शहरांंतील गुणवंतांशी स्पर्धा करीत आपले आणि आपल्या कुटुंबाचेच नाही तर आपल्या शहराचे नावदेखील समाविष्ट करण्यात यशस्वी ठरवीत आहेत.
कधिकाळी चंद्रपूर जिल्ह्यातील मोजके विद्यार्थी स्पर्धा परीक्षा वा उच्च शिक्षणासाठी पात्र ठरीत होते तेंव्हाही मूलशहर त्यांच्यातील एक बनण्याचा प्रयत्न होते परंतू यश मिळेलच याची खात्री नसायची किंबहूना। मिळालेच तरीही ती व्यक्ती ,ते विद्यार्थी नौकरी शोधून या शहरापासून दूर निघून जात असत मात्र आज परिस्थिती बदलत आहे आणि उच्च शिक्षण घेऊनही तरुण आपल्या शहराकडे परतताना दिसत आहेत.
मूल शहर व्यापारी द्रुष्टिकोनातून आर्थिक उलाढालीचे व चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यांना जोडणारे मध्यवर्ती शहर ठरले असल्याने मूल शहराकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे परिणामी इथे शैक्षणिक बदल होऊ लागला आहे.
येथील विद्यार्थी शिक्षणाच्या नवनवीन क्षेत्रात आपली क्षमता अजमावून बघत आहेत आणि त्यात यशस्वी होऊन तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवून तालुक्यात आनंद व उत्साह वाढवित आहेत.
याच कळित मूल तालुक्यातील दाबगाव मक्ता या छोट्या गावातील
*आकाश रवींद्र चिचघरे*
यांनी *पिएचडी* त (डॉक्टरेट म्हणजे आचार्य,)देशातून प्रथम, तर *क्रुषी संशोधक* या पदावर देशात तिसरा क्रमांक व ओबीसी मधून देशात पहिल्या क्रमांकावर येण्याचा मान प्राप्त केला आहे.
तर...
मूल शहरातील व्यावसायिक मनोज अग्रवाल यांच्या मुलाने
यांनी नुकतीच सिएची.परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तसे यापूर्वी सावन बुटे व उधवानी यांनी सिएची परीक्षा उत्तीर्ण केली असून अनिकेत हा मूलमधील तिसरा सी.ए. बनला आहे.
मूल तालुक्यातील या गुणवंताचे विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी उत्स्फूर्तपणे स्वागत व अभिनंदन केले असून यांचे कार्य मूल तालुक्यातील सर्वसामान्य माणसाला व तरुणाईला व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.





Comments
Post a Comment