*सडेतोड* *समित्या गठनाचे भिजतघोंगडे*
*सडेतोड*
*समित्या गठनाचे भिजतघोंगडे*
*दीपक देशपांडे*
शासनस्तरावर शासनाच्या विविध योजनांच्या व्यवस्थित संचालनासाठी अशासकीय सदस्यांची नेमणूक करुन त्यांचे संचालन केले जाते ,या समित्यांवर बहुतेक सत्ताधारी पक्षाच्या क्वचितच विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी उपलब्ध करुन दिली जाते. मात्र आता नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर पाच महिन्यांचा कालावधी लोटत चालला तरीही जून्या बरखास्त केलेल्या वेगवेगळ्या योजनांच्या नवीन समित्या अद्याप तरी कागदावरच आहेत की काय ?असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नुकतीच एक बातमी वाचनात आली आणि वास्तविक स्थिती चे अवलोकन केले असता एकीकडे नव्या समितीत नियुक्ती व्हावी, यासाठी कार्यकर्त्यांची धडपड सुरू आहे तर दुसरीकडे या योजनेच्या लाभासाठी प्रयत्न करणाऱ्या निराधारांची फरफट सुरू आहे.
संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य कृती निवृत्तीवेतन योजना या दोन राज्यस्तरावरील योजनांद्वारे, तर केंद्र पुरस्क्रुत इंदिरा गांधी वृद्धापकाळ विधवा आणि दिव्यांग योजनांद्वारे निराधारांना दरमहा एक हजार रुपयांचे अनुदान दिले जाते.
पूर्वीच्या समित्या बरखास्त केल्यानंतर सध्या तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समित्यांचे कामकाज सुरू आहे. मात्र, तहसीलदारांकडे असणारा अन्य कामांच्या व्यापाचा विचार करता सध्याच्या समित्यांचे गठण होणे गरजेचे आहे.
अशा आहेत विविध योजना
■ संजय गांधी निराधार योजना
■ एससी श्रावण बाळ निवृत्तीवेतन
■ श्रावण बाळ निवृत्तीवेतन एससी केंद्र योजना
■ इंदिरा गांधी वृद्धापकाळ
■ इंदिरा गांधी विधवा योजना
■ इंदिरा गांधी दिव्यांग योजना
उपलब्ध माहितीनुसार लाभार्थ्यांना लवकरच थेट बँक खात्यात अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे.
एका योजनेद्वारे येत्या काही दिवसांत त्याचा प्रारंभ केला जाणार आहे. टप्प्याटप्प्याने उर्वरित सर्व योजनांचे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. ही सर्व तयारी सुरू असताना या समित्यांच्या गठनाची प्रक्रिया अधांतरीच राहिल्याने प्रलंबित प्रकरणातील खरे लाभार्थी या लाभापासून वंचित राहू नयेत.
म्हणूनच शासनाने तातडीने या समित्यांवर सुयोग्य प्रतिनिधींची नियुक्ती करून त्या समित्यांचे कार्यप्रवण करणे गरजेचे आहे .
दीपक देशपांडे, संपादक.



Comments
Post a Comment