सडेतोड.?* *शेतकऱ्यांचे सरकार..?*
*सडेतोड*
*शेतकऱ्यांचे सरकार..?*
दीपक देशपांडे.
*गेल्या कित्येक वर्षांपासून सत्तेवर असणाऱ्या शासनकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ चालविला आहे, कारण दरवर्षी कधी धानाच्या खरेदीवर ५००₹/क्विंटल, तर कधी ७००₹/क्विंटल तर यावर्षी---- *सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान उत्पादनाकरिता प्रति हेक्टर 15 हजार रु. या प्रमाणे दोन हेक्टर मर्यादेत प्रोत्साहनपर रक्कम बोनस म्हणून देण्याचा निर्णय घेतल्याबद्दलची माहिती समोर आली आहे.*
हा निर्णय ऐकून पूणे मुंबई तील आमच्याआप्तस्वकीय ,मित्रपरिवार व नातेवाईकांनी जणू आम्हाला लाटरी लागल्याच्या अविर्भावात फोन करून आमचे अभिनंदन केले तर आमच्या काही सहकाऱ्यांनी शासन १५०००₹कधी जमा करणार अशी विचारणा केली आणि मला हा लेखनप्रपंच करावा लागला, त्यासाठी मी मुद्दाम आजचा *पत्रकार दिनाचा* मुहूर्त निवडला .
*शासनाकडून धान उत्पादनाकरिता प्रति हेक्टर १५ हजार रु. या प्रमाणे दोन हेक्टर मर्यादेत प्रोत्साहनपर रक्कम बोनस म्हणून देण्याचा निर्णय घेतल्याबद्दलची* बातमी खरचं अभिनंदनीय आहेच पण....त्यातीलच एक अट अशी आहे की, *सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना* ही बाब आपण सोयिस्करपणे आपण विसरतो.
वाचकहो, *सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना* या संज्ञेत कोण बसतात हे समजून घेतल्याशिवाय या लाभाची मर्यादा आणि विस्तार लक्षात येणे शक्यच नाही.
या विषयावर कधीतरी स्वतंत्र लेखन करावे लागणार आहे.
*धान उत्पादक शेतकरी शासनाच्या धान्य खरेदी महामंडळाकडे धान्य विक्री साठी नोंदणी करुन आपल्या शेतातील उत्पादित धान महामंडळाला विक्री करेल तो शेतकरी ....फक्त त्यालाच शासनाकडून हे प्रोत्साहनपर बोनस रुपी अनुदान प्राप्त होणार आहे.*
आता याची मर्यादा आपल्या लक्षात येईल.
शासनाची अतिशय चांगली योजना असे आपण क्षणभर मान्य करु. पण.........त्यासाठी शासनाने काही अटी लावून ठेवल्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना जो वेळ आणि खर्च करावा लागणार आहे व ह्या अनुदान प्राप्तीसाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे ती वेगळीच .......त्याबाबतीत सुद्धा नंतर कधीतरी सविस्तर लेखन करु.
शासन दरबारी निर्णय झाला त्याची भरपूर प्रसिद्धी झाली ,अभिनंदनाचे ठराव मंजूर झाले ,पण .......खरा शेतकरी या योजनेचा हिस्सा बनू शकेल काय?खरचं ह्या योजनेचा लाभ त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे का?आजवर कधी मिळाला आहे काय?एक ना अनेक प्रश्न शेतकऱ्यांना शासनाच्या अशा निर्णयामुळे पडत असून चिंता , न्युनगंड व दरी वाढवित आहेत.
क्रुषी उत्पन्न बाजार समितीत धान्य विक्रीसाठी आणणाऱ्या आणि तातडीने पैसा मिळावा ही अपेक्षा असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा तसूभरही लाभ होताना दिसत नाही, व त्यामुळे शेतकरी चिंतातुर आहेत. ही बाब फारच गंभीर आहे परंतू या बाबीकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही याची आमच्या बळीराजाला खरी चिंता आहे.आता ह्या बाबीचा विचार करून शासनकर्त्यांनी अधिक योग्य निर्णय घ्यावा ही सर्वसामान्य शेतकऱ्यांची इच्छा आहे.
दीपक देशपांडे, संपादक.



Comments
Post a Comment