माऊंट कॉन्व्हेन्ट येथील असपाक सय्यद यांचे सुयश
माऊंट कॉन्व्हेन्ट येथील असपाक सय्यद यांचे सुयश
मूल,न्युजब्युरो.
दिनांक ११ जानेवारी २०२३ ला स्वामी विवेकानंद विद्यालय मुल येथे पार पडलेल्या ५० व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मधे माउंट कॉन्व्हेन्ट अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स मूल येथील विज्ञान व गणित शिक्षक अस्पाक सय्यद यांनी विद्यार्थ्यांची गणितातील भिती दूर व्हावी व त्यांच्या मनात गणिता बद्दलची आवड निर्माण व्हावी हा विचार करून प्राथमिक विभाग मधे शिक्षक प्रतिकृती विभागात गणितीय साहित्य बनवून प्रथम क्रमांक पटकाविला.
या कार्यक्रमात शशिकांत धर्माधिकारी , विष्णुकांत टेकाडे, वैभव खांडरे नितीन घरोटे आणि इतरांची प्रमुख उपस्थीती होती.
शाळेचे मुख्याध्यपक रवी कावळे ,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले व समोर होऊ घातलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीकरीता शुभेच्या दिल्या आहेत ,तसेच नगरातील शिक्षण क्षेत्रात त्यांच्या प्रतिकृतीची चर्चा आहे.


Comments
Post a Comment