सडेतोड......
सडेतोड
दीपक देशपांडे.
मूल शहरात टुल्लू पंपचा वापर केल्याने बऱ्याच ठिकाणी नागरिकांना पाणी पुरवठा योग्य प्रकारे होत नसल्याची बाब उघड केली गेली.
ही बातमी बऱ्याच वेळा वेगवेगळ्या प्रकारे पुढे आणली जात होतीच परंतू आज नगरातील एका वार्डातील सर्वसामान्य महिलांनी पुढे येत नगरप्रशासनाला निवेदन सादर केल्याने पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
आजपर्यंत अशा मागण्या राजकीय अस्तीत्व सिद्ध करण्यासाठी केल्या जात होत्या तशीच ह्या मागणीलाही तसा अप्रत्यक्ष राजकीय वरदहस्त आहेच .
परंतू सत्य परिस्थिती विषद करणारी आणि जनतेला आश्वासनांच्या भुलथापांची झुल पांघरणाऱ्यांची पोलखोल करणारी मागणी असे म्हंटले तर.....।
गत काही काळापासून मूल नगरीत २४×७पाणी पुरवठा करण्यासाठी मोठा निधी खर्च केला गेला आहे, त्याची वारंवार वाच्यताही केली गेली होती पण वास्तविकता वेगळीच आहे.
२४×७तर सोडाच पण दररोज एकवेळ किमान तासभरसुद्धा एकसमान वेगात पाणीपुरवठा होत नाही आणि त्यातच ही एक नवीनच समस्या पुढे आली आहे ,ही जर समस्या असेलच तर आता त्यावर उपाययोजना कोणी करायची?
नगरात प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहे आणि निवडणूक आयोगाने अजूनही निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला नाही त्यामुळे लोकप्रतिनिधी नाहीत अशावेळी सर्वसामान्य नागरिकांना आपल्या पक्षाच्या नेतेमंडळींना याबाबत सुचित करून न्याय मिळवून देण्यासाठी वेठीस धरता येत नाही .
कुणीतरी असे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे ,आता या प्रश्नांची उकल करण्यासाठी कोण पुढे येणार हे आपण बघत राहायचे की भावी नगरसेवक ह्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी जनतेने उपस्थित केलेल्या समस्येचे निराकरण करणार?
शेवटी त्यांच्याही उद्याच्या अस्तित्वाची हीच तर खरी कसोटी असणार आहे.
पटलंच तर काहीतरी कराच, नाहीतर येणाऱ्या उद्याच्या दिवशी तुम्हाला हाच प्रश्न निवडणूक रिंगणात उतरल्यावर कुणी विचारल्यास वावगे ते काय?
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, स्वागत.
दीपक देशपांडे.

Comments
Post a Comment