बहुमतातील लोकनियुक्त सरपंचावर अविश्वास ठराव मंजूर करून पायउतार करण्याची वेळ कां यावी?*

 *बहुमतातील लोकनियुक्त सरपंचावर अविश्वास ठराव मंजूर करून पायउतार करण्याची वेळ कां यावी?*





*दीपक देशपांडे.*

मूल तालुक्यातील बेंबाळ या गावात भाजपने २०१७ साली तत्कालीन काॅंग्रेसचा पूर्ण सफाया करीत जनतेतून सरपंच निवडीसह पूर्ण सदस्य विजयी करीत एकहाती सत्ता हस्तगत केली.

लोकनियुक्त सरपंचा करुणा उराडे यांचे नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीच्या कामकाजाला सुरुवात झाली , दिवस, महिने, वर्षं, पूढे सरकू लागली. सारेच कसे व्यवस्थित सुरू होते.गाव विकासाची कामे करत पुढे सरकत होता..... सारेच कसे आलबेल सुरू होते आणि....

.... आणि अचानक असे काय घडले असेल की ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांच्यातील वाद इतका विकोपाला गेला की सदस्यांनी लोकनियुक्त सरपंचा करुणा उराडे यांचे विरोधात जिल्हाधिकारी यांचेकडे अविश्वास प्रस्ताव सादर केला.

दिनांक १८/०६/२०२१ रोजी मान. तहसिलदार डॉ.रविंद्र होळी यांचे उपस्थितीत या विषयावर बेंबाळ ग्रामपंचायत कार्यालयात चर्चा होऊन १०विरुद्ध ०मतांनी हा अविश्वास प्रस्ताव पारित करण्यात आला.१सदस्य तटस्थ राहिले. 

*भाजपसाठी हा विजयी क्षण,की विरोधकांनाही एक नवी संधी?* हा प्रश्न आपसूकच पुढे आला.कारण....


हा प्रस्ताव सादर करण्यापूर्वी भाजपचे तालुका आणि जिल्हा स्तरावरील मोठ्या नेत्यांना याबाबत सुचनाही दिली गेली असणारच आणि त्यांच्या सुचनेनुसार पुढिल सारी कार्यवाही झाली असणार हेही गृहीत धरले तरीही इथे नेमके कुणाचे चुकले ह्याबाबत दोन विचार प्रवाह पुढे येतातच आणि झालेल्या कृतीचं नेमकं उत्तर मनाला समाधान देऊ शकत नाही.ही वस्तुस्थिती आहे.

कारण त्या सरपंचांना पायउतार करण्यासाठी दिलेली कारणे आणि सरपंचांनी दिलेले स्पष्टीकरण यांचा दूर दूरपर्यंत मेळ बसत नाही,म्हणूनच दोन भिन्न मतप्रवाह घेऊन बातम्या प्रसारित होत आहेत.त्यामुळे *सत्तासंघर्षाला बळी ठरले बेंबाळचे सरपंचपद* असे म्हणण्याची वेळ आली आहे.


लोकनियुक्त सरपंचा भाजपच्या कोट्यातून, निवडून आलेले सर्वच्या सर्व ११सदस्य भाजपचे, गावातील वजनदार राजकीय नेतृत्व पंचायत समितीचे सभापती चंदू मारगोनवार भाजपचे, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनूले भाजपच्या तालुका अध्यक्षस्थानी, निवडणूक ज्यांच्या मार्गदर्शनाखाली लढली गेली ते मातब्बर नेते माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार भाजपचेच ना? तरीही ही वेळ....?


*घरचा वाद घरीच मिटवता नसता का आला?* असा प्रश्न कुणितरी उपस्थित केला आणि ... पायाखालची जमीन सरकली असा भास झाला.


बेंबाळ गावातून उभा राहिलेला हा अंतर्गत वादाचा संघर्ष वरवर वाटत असला तरी तो एवढा साधा व सरळ नक्कीच नाही, ही तर जिल्ह्यातील भाजपमधील अंतर्गत वादाची आणि सत्तारुढ पदाधिकारी यांचे विरोधात धुमसत असलेल्या विवादाची ठिणगी तर नाही ना?

याचा शोध आणि बोध घेण्याची नितांत आवश्यकता या निमित्ताने पुढे आली असल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.

त्यामुळे विवादीत लोकनियुक्त लोकप्रतिनिधी वेळीच याची दखल घेऊन आपली भूमिका बदलतील नाहीतर कुठेही केंव्हाही कधीही काहीही घडणे अवघड आणि अशक्य नाही , असा एक मतप्रवाह या सत्तासंघर्षातील अनेक मान्यवर आमचे जवळ व्यक्त करुन गेले.

*सत्तासंघर्षातील बेंबाळ* असे नवे बिरुद जर कुठे वापरात आलेच तर नवल वाटायला नको.

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.